रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक

 रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जेरबंद; हैदराबाद मध्ये अटक
नगरी दवंडी

हमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ  बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता.

 जरे यांची 30 नोव्हें रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. या नंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. पोलीस पथके त्याचा सर्वत्र शोध घेत होते. अखेर त्याला हैद्राबाद येथून अटक झाली. सुपारी देऊन बोठे याने जरे यांची हत्या का केली हे आता समोर येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here