कल्याण रोडची ओळख नवीन उपनगर म्हणून होतेय- आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

कल्याण रोडची ओळख नवीन उपनगर म्हणून होतेय- आ. संग्राम जगताप

 कल्याण रोडची ओळख नवीन उपनगर म्हणून होतेय- आ. संग्राम जगताप

लक्ष्मी नारायण शिशु मंदिर शाळा ते कुंभार सोसायटीपर्यंत रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर-कल्याण रोड भागांमध्ये रहिवाशी वसाहात झपाट्याने वाढत आहे. या भागाचा विस्तार देखील मोठा आहे. विविध नागरी सुविधा नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आता या भागातच रहिवासी होत आहे. या भागामध्ये अनेक कॉलेजे, हॉस्पिटल, अनेक संस्था याभागात स्थायिक झाल्या आहे. त्यामुळे नगर कल्याण रोड परिसराची ओळख आता सुसज्ज उपनगर म्हणून भविष्यात होईल, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक 8 मधील नगर-कल्याण रोड परिसरात असणार्‍या लक्ष्मी नारायण शिशु मंदिर शाळा ते कुंभार सोसायटी पर्यंत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आ.जगताप बोलत होते. या प्रसंगी  महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक श्याम नाळकांडे, नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक अजय चितळे, संजय झिझें, नगरसेवक योगीराज गाडे, अरविंद धिरडे, जितेंद्र लांडगे, सतीश झिकरे, विक्रम पाठक, महेश कांबळे उपस्थित होते.
 पुढे बोलतांना आ.जगताप म्हणाले, जेव्हा-जेव्हा या भागातील नागरिक त्यांच्याकडे विकास कामाची मागणी करतात. तेव्हा तेव्हा विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे  या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे. विकास कामाचे नियोजन करून प्राधान्यक्रम ठरविला असून नगर शहरात विकास कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here