माका येथे सुवर्ण ज्योत अर्बन निधी शाखेचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

माका येथे सुवर्ण ज्योत अर्बन निधी शाखेचे उद्घाटन

 माका येथे सुवर्ण ज्योत अर्बन निधी शाखेचे उद्घाटननगरी दवंडी

माका - नेवासे तालुक्यातील माका या ठिकाणी श्री.क्षेत्र तारकेश्वरगडाचे महंत आदिनाथ महाराज शाश्री यांच्या शुभहस्ते,तसेच लक्ष्मीमाता अर्बननिधी शाखा बिड चेअरमन परमेश्वर राठोड,व जिल्हाबॅंकेचे शेवगाव तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके यांच्या उपस्थितीत सुवर्णज्योत अर्बन निधी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.                 अर्बन निधी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकार शहादेव वाकडे यांनी ग्रामीण भागातील निधी शाखेच्या संबधित ग्राहक खातेदारांना भविष्यात येणारयां आर्थिक संकटात आर्थिक बचत करून पैसे गुंतवणुक तसेच पैसे कमवीण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.शाखेचे चेअरमन सतिष वाकडे यांनी ग्राहक खातेदारास आधारकार्डावरुन पैसे काढणे व टाकणे,पैसे तपासणी,तसेच मिनी एटीएम, मनी ट्रांसपोर्ट बाबतीत माहिती दिली.                                             याप्रसंगी परिसरातील सरपंच शहादेव खोसे, वाकडे साहेब,गंगाधर भुजबळ,रासपचे नेवासे तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे,अर्थदिप निधी शाखेचे चेअरमन शिंदे सर,पत्रकार श्यामराव काळपुंड,सुभाष बुधवंत, आखदवाडेचे उपसरपंच ज्ञानेश्वर उगले, ग्रामस्थ श्रीकांत उगले,कैलास बडे सर,भागवत बडे,डाॅ.भुजबळ,डाॅ. गायकवाड,रवी पालवे,योगेशआव्हाड,मिनिनाथ खोसे, बबन ढाकणे,जनार्दन बुधवंत,बंटी वाकडे,सुनील वाकडे, कचरु सानप,अविनाश वाकडे,बाबा पुंडे,श्रीधर वाघुलकर उद्धव तांदळे,शशी वैरागर,अशोक पठाडे,अशोक सानप, थोरात सर,तसेच परिसरातील इतर ग्रामस्थ,चेअरमन सदस्य कमीटी,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत लोकेश घोडके,संदीप वाघुलकर यांनी केले तर,चेअरमन वाकडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here