अमृत योजना.. भुयारी गटार योजनेची कामे निकृष्ट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

अमृत योजना.. भुयारी गटार योजनेची कामे निकृष्ट.

 ठेकेदार, अधिकार्‍यांचा शासनाच्या तिजोरीवर दरोडा?

अमृत योजना.. भुयारी गटार योजनेची कामे निकृष्ट.

शिवराष्ट्र सेनेचे आजपासून आमरण उपोषण

या योजनेत ठेकेदार एजंनसीला करारा प्रमाणे रस्ते पॅचिंग व याईप तुटल्यास दुरूस्ती हे सर्व कामे ठेकेदार एजंनसी कडे आहे मनपा इंजिनीअर हे मनपा चे कर्मचारी व   700ते800 रू तासाचा जेसीपी लाऊन शासकीय सुट्टी च्या दिवशी काम करतात मग प्रश्न असा पडतो की ठेकेदार हा मनपाचा जावई आहे का ? सध्या भुयारी गटार पाईप हे निकरूषठ दर्जाचे असुन लोड ची वाहणे घेल्यास ते दबून तुटतील व चेंबर बिगर काँक्रीट असुन व पाईप लाईन आथरताना त्या खाली कुठलेही काँक्रीट नसुन मोकळे च टाकलेले आहे. मग हे काम 20 वर्ष टिकेल कसे या वर देखरेख करणारे अधिकारी इंजिनीअर घरी बसून काम करतात नाहीतर रजेवर असतात त्यामुळे ठेकेदार एजंनसी ने मनमानी कारभार सुरू केला आहे.शहरातील अकुशल कामगारांन मार्फत काम चालु आहे तसेच मेन ठेकेदाराने दोन ते तीन सब ठेकेदार निवडले असुन कराराचा भंग केला असून सर्व गोंधळ शहरात चालवला आहे महीने महीने खड्डे खोदून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. भुयारी गटार हा फक्त शब्द असुन यातुन उंदिर व घुस सुध्दा जानार नाही या मुळे भविष्यात गटार तुंबलयास रस्त्यावर वाहतील ब-याच ठीकाणी पाण्या च्या पाण्यात मैला मिश्रित पाणी मिक्स होत असून नागरिकांना जुलाब उलट्या पोटदुखी डोकेदुखी एसिडीटी हे आजार होत आहेत.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी मंजूर केलेली 125 कोटी रुपयांची अमृत योजना, शहरातील अनेक प्रभागात कामे चालू असणारी गटार योजना यांसह शहरातील अनेक योजना या भ्रष्टाचाराला खतपाणी घालीत आहेत. या योजनेतील कामे अतिशय निकृष्ट असून या योजनेतील पैसे लुटून ठेकेदार व अधिकारी शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत. अशा निकृष्ट कामांची बिले काढून ठेकेदार कोट्यवधी रुपयांची लूट करीत आहेत अशा ठेकेदारांवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी शिवराष्ट्र सेनेच्या वतीने आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष तुपे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगरात भुयारी गटार कलंक असून दुशित पाणी, खड्डेमय रस्ते यापासून आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. नगर शहरासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने व मनपाने मंजुर केलीली 125 कोटी रुपये खर्च करून सुरू केलेली अमृत योजना शहराच्या विकासाला बाधा ठरत असून नागरिक पोटाला गाठ बांधुन नगर पालिकेची विविध स्वरूपाने पटी भरत असुन त्या पैशावर एक प्रकारे दरोडाच ठेकेदार एजंनसी टाकत आहे. यामुळे शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने आमरण उपोषण दि 24 - 3 - 2021 रोजी सुरू केले असून श्री संतोष नवसुपे पुढे म्हणाले ही योजना भ्रष्टाचारला प्रोत्साहन देणारी ठरली आहे यात सर्व प्रतिनिधी व पक्ष गप्प असुन कोणी चकार शब्द काढत नसुन एरवी महासभेत एक मेकांचया अंगावर पडणारे प्रतिनिधी या योजने मध्ये गप्प का आहेत?
नागरीक कोरोना म्हणून दवाखान्याचे लाखो रूपयाचे बिल भरत आहेत. शहरात काही ठिकाणी सुंदर काँक्रीट व डांबरी रस्ते आहेत तेही या खोदकामात खराब होतात आहे. या नंतर गंभीर असा पावसाळा सुरू होत आहे यात शहरातील नागरिकांना विवीध समस्येला सामोरे जावे लागणार आहे तसेच ही योजना मुळात सहा महिने लेट सुरू झालेली असुन अद्याप या ठेकेदाराला दंड केला नसून त्याला  कोटी रुपये बिले देण्यात आली आहे यात ठेकेदार एजंनसीने सर्वांचे तोंड बंद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करता नगर शहरातील नागरिकां च्या नगरी सुविधांसाठी शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने या आदी याच मुद्यांवर उपोषण करण्यात आले असून या ठेकेदाराला मनपाने कुठलेही कारवाई केली नसून आता शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून
मनपा ने ठेकेदाराला अटी व शर्ती चा भंग केला त्या साठी दंड करण्यात यावा, ठेकेदाराला सब ठेकेदार निवडता येत नसून प्रशासनाने ज्या अधिकार्‍यांनी परवानगी दिली त्यांच्या वर कारवाई करावी, ठेकेदाराला पिण्याचे पाईप दुरूस्त करण्याची मनपा अधिकच जी मदत करतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ठेकेदाराचे पावसाळा सुरू झाल्याने चांगले रस्ते खराब होत असून काम बंद करण्यात यावे त्या मुळे रस्ते वाचतील, ठेकेदाराने विवीध गोष्टींचा भंग केल्याप्रकरणी त्याचा काळ्या यादीत समावेश करण्यात यावा. या सर्व अटी मंजुर व कारवाई चे पत्र दिल्या नंतरच आमरण उपोषण सोडले जाईल असे शिव राष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष श्री संतोष नवसुपे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष अक्षय कांबळे, दलित आघाडी जिल्हाअध्यक्ष अनिल शेकटकर, शेतकरी संघटना अध्यक्ष भैरवनाथ खंडागळे, ओबीसी आघाडी जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब करपे, शंभू नवसुपे, बाबासाहेब जगदणे, गणेश शेकटकर, दत्तात्रय घोडके, रावसाहेब नेटके उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment