पत्रकार चौक येथे लहान मुलांसाठीच्या ‘सॉफ्ट प्ले एरिया’ दालनास प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

पत्रकार चौक येथे लहान मुलांसाठीच्या ‘सॉफ्ट प्ले एरिया’ दालनास प्रतिसाद

 पत्रकार चौक येथे लहान मुलांसाठीच्या ‘सॉफ्ट प्ले एरिया’ दालनास प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील पत्रकार चौकातील पराग प्लाझा बिल्डींगमध्ये लहान मुलांसाठी ‘सॉफ्ट प्ले एरिया’ सुरू करण्यात आला असून गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी लहान मुलांची हजेरी वाढत आहे. विविध नवनव्या प्रकारची खेळणी लहान मुलांना खेळण्यासाठी येथे उपलब्ध असून यातून मुलांसाठी कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.
या ‘सॉफ्ट प्ले एरिया’मध्ये डिफ्रंट साईड्स अ‍ॅक्टिव्हिटी, जंपिंग ट्रॅम्पोलिन, कार राईड, कार्टून क्रिकेट गेम यांसह लहान मुलांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या उपलब्ध आहेत. दररोज सकाळी 10 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी लहान मुले येऊ शकतात व या खेळण्यांचा आनंद लुटू शकतात, अशी माहिती देण्यात आली. लहान मुलांपासून साधारण 12 वर्षे वयाची मुले येथे येऊ शकतात.
या सॉफ्ट प्ले एरियाचे वर्णन ‘छोटे बच्चों के अच्छे दिन’ असे केल्यास संयुक्तिक होईल. नगरमध्ये आतापर्यंत कुठेही न दिसलेली अनेक नवीन प्रकारची खेळणी या ‘मेहेर प्ले झोन’ सॉप्ट प्ले एरियामध्ये मुलांसाठी उपलब्ध आहेत. कितीही खेळले तरी लहान मुले येथून निघण्यास तयार होत नाहीत, असा अनुभव येथे पालकांना नेहमीच येतो. अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन येथे पुन्हा पुन्हा येतात.
या ठिकाणी खेळण्यास येणार्या मुलांवर लक्ष देण्यासाठी सपोर्ट स्टाफ उपलब्ध आहे. कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासनातर्फे देण्यात येत असलेले कोविड प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन येथे केले जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment