कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन यंत्रणा पुन्हा सज्ज, नियम मोडणार्‍यांवर कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन यंत्रणा पुन्हा सज्ज, नियम मोडणार्‍यांवर कारवाई

 कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे प्रशासन यंत्रणा पुन्हा सज्ज, नियम मोडणार्‍यांवर कारवाई


पारनेर प्रतिनिधी

तालुक्यातील सुपा शहरात सर्व नियम धांब्यावर बसवून मोकाट व नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरीकांवर पोलिस प्रशासनाने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महीनाभरापासुन कोरोना संक्रमित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्याने आरोग्य कर्मचारी व पोलीस प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. सुपा पोलिसांनी  सुरक्षेचे नियम मोडणारावर कडक कारवाई चालू केली आहे.
     सुप्यासह पारनेर तालुक्यात गेल्या काही दिवासात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात शुक्रवारी 28 तर शनिवारी 23 बाधीत कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत तर रविवार पारनेर तालुक्यात 92 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण वाढत आसल्याने शासनाने कोरोना संदर्भात नियम मोडणारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आसल्याने सुपा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रकांत कोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना.संदीप पवार,  पो. कॉ. कल्याण लगड, चौधरी,  हवलदार कुटे, होमगार्ड टकले यांचे पथक रोज सुप्यातील वर्दळीचा भाग आसलेल्या पारनेर रोडवरील बाजारतळ चौकात मास्क न वापरने ट्रिबल शिट प्रवास करणे गाडी चालवत फोनवर बोलणे  अशा नागरीकांवर कारवाई करत त्याच्याकडून आँनलाईन किंवा आँफलाईन दंड वसूल केला जात आहे.
    औद्योगिक वसाहतीमुळे सुपा शहरात नागरिकांची मोठी गर्दी असते. नोकरदार वर्ग सध्यांकाळी खरेदी किंवा फिरायला बाहेर पडत आसतो तेव्हा  बाजारतळ भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते यात काही नागरिक सुरक्षेची कुठलीच उपाय योजना करत नाही. यामुळे सुपा पोलिस अशा बेफिकीर नागरिकांवर कडक कारवाई करत आहेत. प्रशासनाच्या वतीने नियम शिथिल केल्यानंतर सुपा शहरात खास करून बुधवारी बाजारात मोठी गर्दी होते याठिकाणी कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत.त्यादिवशी पोलिस प्रशासनाने नियम मोडणारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here