मुंगूसच्या तावडीतून सर्पमित्राने वाचविला धामिणीचा जीव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

मुंगूसच्या तावडीतून सर्पमित्राने वाचविला धामिणीचा जीव

 मुंगूसच्या तावडीतून सर्पमित्राने वाचविला धामिणीचा जीव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह मध्ये आज दुपारी बारा वाजता ऐन उन्हाच्या कहरात मुंगूसाने एका धामिणीचा पाठलाग करत असताना झाडावर चढलेली धामिण जीव मुठीत धरून बसली होती हे दृश्य रवी सोनवणे यांनी बघितले त्यांनी लगेचच सर्पमित्र आकाश जाधव यांना हा प्रकार सांगितला                                         या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुंगूसाला दूर केलं आणि झाडावर गेलेली धामिण खाली पाडून तिला पकडले यावेळी ऋषिकेश जाधव कुमार बनसोडे कृनाल भिंगारदिवे अमोल जाधव यांनी धामिणीला पुन्हा निसर्गात मुक्त केले                   ऐन उन्हात धामिणीने काही तरी खाल्ल्याने व मुंगूस मागे लागल्या मुळे ती चवताळून सर्पमित्र टीमच्या अंगावर धावून येत होती पण तरीही 10 मिनिटात तिला पकडण्यासाठी लागले               फोटो ओळी  शासकीय विश्रामगृहमध्ये पाच फुट लांब व2किलो वजनाची धामिण पकडण्यासाठी सर्पमित्र ऋषिकेश जाधव कुमार बनसोडे कुणाल भिंगारदिवे अमोल जाधव यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here