जळगावला गेलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेडलाच ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

जळगावला गेलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेडलाच !

 जळगावला गेलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेडलाच !

आ. रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश.


जामखेड-
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे दोन वर्षांपूर्वी,राज्य राखीव पोलीस बल गट क्र,19  पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते मात्र, हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात हलवण्यात आले होते. त्यामुळे जामखेडकरांना मिळालेली महत्वाकांक्षी योजना हातातून गेली होती. मात्र, हे पोलिस प्रशिक्षण केंद्र पुन्हा कुसडगावलाच व्हावे याकरिता आमदार रोहित पवारांनी राज्याच्या मंत्रीमंडळात आपले वजन वापरले.सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे पोलीस प्रशिक्षण केंद्र याठिकाणी पुन्हा आणले. त्यामुळे  सेफ्टी आणि सिक्युरिटीचा चांगला फायदा होणार आहे. हे सेंटर नगरसाठी एकुलते एक आहे. त्यामुळे नगरला मोठी मदत होईल. सोलापूर, धाराशिव, बीड या शेजारच्या जिल्ह्यांनाही या प्रशिक्षण केंद्राची मदत होणार आहे.
महायुती सरकारच्या काळात मंजूर झालेले मात्र नंतर जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आलेले भारत बटालियन राज्य राखीव पोलीस दल केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणण्यात आमदार रोहित पवार यांना यश आले आहे. हे केंद्र पुर्वीच्या जागी तालुक्यातील कुसडगाव येथे होणार आहे. तस आदेश गृह विभागाचे कार्यासन अधिकारी दिनेश सस्ते यांनी जारी केला आहे. तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे गृहराज्यमंत्री आसताना 2017 मध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयासाठी कुसडगाव येथिल सरकारी गायरान जमिनीची जागा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा आराखडा तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या कामाचे टेंडर निघून काम सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जामखेड तालुक्याच्या शिरपेचात कुसडगावमध्ये होणारे प्रशिक्षण केंद्र महत्वाचे असणार आहे.
राज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे  मंजूर करून घेतले. आमदार रोहित पवारांचा याकरिता पाठपुरावा सुरू होता. आमदार रोहित पवार निवडून आल्यानंतर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले. या प्रशिक्षण केंद्रांमुळे जामखेड तालुक्याच्या वैभवात भर पडेल. याकरिता लागणार्‍या जागेचे हस्तांतरण महसूल विभागाकडून राज्य राखीव पोलिस दलाकडे करण्यात आले. या जागेची पहाणी करण्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी कुसडगावला आल्या होत्या. त्यांच्यासमवेत अधिकार्‍यांचा फौजफाटा होता.  राज्य राखीव पोलीस दलाचे कुसडगावला स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र होत आहे. एकूण अकराशे पोलिस  येथे राहणार आहेत. हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारल्याने तालुक्यात रोजगाराच्या वाटा उपलब्ध होणार आहेत. याप्रसंगी पोलिस उपमहानिरिक्षक संजय बावीस्कर, समादेश श्रीकांत पाठक, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, चंद्रकांत मकर, सचिन अडाले, पोलिस उपनिरीक्षक सुनील ढोंबरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here