कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाची दंडात्मक कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाची दंडात्मक कारवाई

 कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणार्‍यांवर जिल्हा प्रशासनाची दंडात्मक कारवाई

मास्क वापर टाळणार्‍यांकडून तब्बल 11 लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा कार्यरत झाल्या असून नियमांचे उल्लंघन करणार्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने ही कार्यवाही अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 20 फेब्रुवारीपासून ते दिनांक 3 मार्चपर्यंत मास्क न वापरणार्या 10 हजाराहून अधिक जणांवर दंड़ात्मक कार्यवाही करुन तब्बल 11 लाख 36 हजार सातशे रुपयांचा दंड़ वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मागील महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या. रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे आदींबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. याशिवाय, गर्दी टाळण्याचेही आवाहन केले. नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांना निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यात नियम मोडणार्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
दिनांक 20 फेब्रुवारी ते 03 मार्च, 2021 या कालावधीत लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अशा 957 ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 191 ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करुन 2 लाख 4 हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच मास्क न वापरणार्या 10 हजार 150  जणांकडून 11 लाख 36 हजार सातशे रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,  जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत तालुका आणि गावपातळीवरील सर्व यंत्रणेला निर्देश दिले आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संबंधितांना दंडा्त्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. मास्क न वापरणार्यांना वचक बसावा यासाठी दंडाची रक्कम आता शंभर रुपयांवरुन पाचशे रुपये इतका करण्यात आला आहे.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here