वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सागर चाबुकस्वार यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सागर चाबुकस्वार यांची नियुक्ती

 वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सागर चाबुकस्वार यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल दादासाहेब पाडळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी सुनील शिंदे, विनोद गायकवाड, भिमयोध्दा जीवन कांबळे, युवा नेते संदीप गायकवाड, रुपेश बनसोडे, विलास साळवे, अक्षय पाथरिया, नागेश पाथरिया, भूषण कांबळे, रवि भिंगारदिवे, मनोज भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
सागर चाबुकस्वार यांनी वंचित बहुजन आघाडीच्या भिंगार शहराध्यक्षपदी उत्कृष्टपणे केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगर-भिंगार शहर बस सेवा सुरु करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करुन चालू केली आहे. सामाजिक कार्यात देखील त्यांचे योगदान असून, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल दादासाहेब पाडळे यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना चाबुकस्वार यांनी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पक्ष बळकट करण्यासाठी दिलेली जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment