जामखेड आगाराकडून प्रवाश्यांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

जामखेड आगाराकडून प्रवाश्यांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष.

 जामखेड आगाराकडून प्रवाश्यांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष.

 आगाराजवळ उभारलेल्या शेडचा वापर "नशाबाजांसाठी"



नगरी दवंडी

जामखेड प्रतिनिधी :

जामखेड आगाराकडून प्रवाश्यांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष केले जात असून जामखेड येथील सुप्रसिद्ध उद्योजक एच. यु. गुगळे यांनी प्रवाश्यांच्या सोईसाठी आगाराजवळ

 उभारलेल्या प्रवाशी शेडचा वापर "नशाबाज, मटकाप्रमी व निरुद्योगी लोकांसाठी होत असून शेडपुढे खाजगी वाहनासाठी वाहनतळ झाले आहे. या सुंदर वास्तुचा वापर फक्त उद्घाटना अभावी रखडला असल्याने डेपो जवळून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना सद्याच्या भयंकर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. 

    जामखेड तालुका हा चार जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला तालुका आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची ये-जा असते. लांब पल्ल्याच्या गाडय़ा ह्या जशा बसस्थानकावरून सुटतात तशाच्या त्या आगाराजवळही उभ्या राहतात. मात्र या ठिकाणी एच. यु. गुगळे यांच्यावतीने  उभारण्यात आलेले प्रवाशी शेडचे उद्घाटन न केल्याने त्याचा वापर होत नसल्याने या प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. 

याकडे आगारातील जबाबदार अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दिसत आहे. आगारातून जास्त प्रमाणात जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात जाणारे जेष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी या आगारातून बस-मधे बसतात. आगारात या प्रवास्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय यांच्याही सुविधांचा अभाव आहे. पण जी सुविधा निर्माण झाली आहे, त्यांचाही वापर सुरू करून देण्यास जामखेड आगाराचचे अधिकारी उदासीन आहे. 

ज्यावेळी येथे प्रवाशी शेड नव्हते त्यावेळी येथील गरज ओळखून एच. यु. गुगळे समुहाचे सदस्य रमेश गुगळे यांनी येथील प्रवाशी व एस. टी चे अधिकारी यांच्या मागणीवरून हे प्रवासी शेड उभारण्यात आले होते. आगारातील अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे प्रवास्यांचा भ्रमनिरास झाला आहे. एस. टी. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेडच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाश्यांमधून होत आहे. 

प्रवासांच्या सोईसाठी निर्माण करून दिलेल्या शेड बाबत एच.यु गुगळे फर्मचे रमेशशेठ गुगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही दोन-तीन वेळा संपर्क केला. मात्र एस. टी. चे अधिकारी शेडचे उद्घाटन करून प्रवाशांना सुविधा सुरू करून देण्यास उदासीन का आहेत हे समजले नाही.

No comments:

Post a Comment