युवकांनी रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती व्यक्त केला आदर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

युवकांनी रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती व्यक्त केला आदर

 युवकांनी रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रती व्यक्त केला आदर

श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या नगर शाखेचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एकाचवेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी  मोगल, इंग्रज, डच व आप्तेष्ट यांच्याशी संघर्ष करत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करत स्वतःचे बलीदान दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान कधीही, कोणीही विसरु नये. श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांच्या स्मृती कायम जागृत रहाव्यात, यासाठी दरवर्षी नगरमध्ये बलिदान मास पाळण्यात येतो. यावेळी श्रीशिव प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते विविध दैनदिन गोष्टींचा त्याग करुन महिनाभर सुतक पाळतात. यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान करुन युवकांनी त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे, असे प्रतिपादन श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नगर शाखेचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी केले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीशिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या नगर शाखेच्यावतीने बलिदान मास पाळला जात आहे. शिबीराचा शुभारंभ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी विनोद काशिद, अक्षय सुकटकर, रवि परदेशी, अमोल शिंदे, आशिष क्षीरसागर, अंकुश तरवडे, साई भोरे, डॉ.झेंडे आदिंसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रा.स्व.संघाच्या जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा बलिदान मास महिनाभर पाळतांना छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी केश मुंडण करतात, पायात चप्पल न घालता अनवाणी रहातात, महिनाभर गोड पदार्थ खाण्याचे टाळतात, कोणत्याही उत्साही व आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होता हिंदू धर्म रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेल्या यातनांचे चिंतन करत धर्मरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प करतात. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रविवारी दि.11 एप्रिल रोजी फाल्गुन दर्श अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र वडु बुद्रुक येथून नगर शहरात धर्मवीर मशाल आणण्याचे नियोजन प्रतीवर्षाप्रमाणे करण्यात आले आहे. या धर्मवीर मशालीसह सायंकाळी 5.30 वाजता नगर शहरातील एस.टी.स्टॅण्डजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पासून मुक पदयात्रा काढण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here