“चाईल्ड लाईन”चं रोज नाईट पेट्रोलिंग. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

“चाईल्ड लाईन”चं रोज नाईट पेट्रोलिंग.

 “चाईल्ड लाईन”चं रोज नाईट पेट्रोलिंग.

आत्तापर्यंत 14,000 बालकांशी सुसंवाद व पुर्नवसन..

समाजातील निराधार, घरातील व समाजातील शोषणांनी त्रस्त, लैगिंक अत्याचाराला बळी पडलेले, निवारा शोधणारे, बाल कामगार, हरवलेली व भावनिक आधार शोधणारी बालके यांच्यासाठी काम करणार्‍या चाइल्ड लाइन संस्थेचे नगरमध्ये 2003 साली काम सुरू झाले. या चाईल्ड लाईन आता पुढील महिन्यात 18 वर्ष पूर्ण होईल .  सुरुवातीला काम करीत असताना सर्वात जास्त बालकांसंबंधी केसेस या रात्री येत असल्याचे स्वयंसेवकांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिस ज्याप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करतात, त्याप्रमाणे आपण बालकांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाईट पेट्रोलिंग सुरू करणे योग्य ठरेल, असे मत काही स्वयंसेवकांनी मांडले व नगर चाइल्ड लाइनने नाईट पेट्रोलिंग करण्याचा उपक्रम 2005-06 याकाळात हाती घेतला. देशातील अशा पद्धतीचा हा पहिला उपक्रम आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बाल भिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये चाईल्ड लाईन शून्य ते 18 वर्षांखालील मुलामुलींच्या मदतीसाठी कार्य करते.  शहरातील माळीवाडा, तारकपूर, पुणे बसस्थानक, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी, केडगांव, नेप्ती नाका, भिंगार अशा भागात दररोज रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत राउंड मारणे... या भागात कोणी लहान मूल एकटे दिसल्यास त्याच्याशी संवाद साधणे... आणि तातडीने बालक कल्याण समितीची परवानगी घेऊन संबंधित बालकाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे... असे नाईट पेट्रोलिंगचे काम येथील चाइल्ड लाइनचे स्वयंसेवक गेल्या दहा- पंधरा वर्षांपासून करीत आहेत. नाईट पेट्रोलिंगचा उपक्रम राबविणारे अहमदनगर चाइल्ड लाइन हे देशातील पहिले युनिट असून त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे. 2003 ते 2021 या काळात 14 हजारांच्या पुढे बालकांशी सुसंवाद साधून त्यांचं पुनर्वसन करण्यात आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव ओळखुन अहमदनगर शहरात रात्री कडक लोकडाऊन लावण्यात आले आहे. या वेळी रात्रीची गस्त पोलीस करत असतात . या प्रमाणे बेवारस , काळजी , संरक्षण आणि निवारा  या गरज असल्याल्या बालकांचा शोधत चाईल्ड लाईन ही हेल्पलाईन यांची सुद्धा रात्रीची गस्त चालू असते , चाईल्ड लाईन’ हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते 18 च्या आतील वयोगटातील मुला-मुलींकरिता 24 तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे.
दररोज रात्री अकरा वाजता चाइल्ड लाइनचे दोन स्वयंसेवक नाईट पेट्रोलिंगसाठी दुचाकीवर निघतात. या स्वयंसेवकांना सार्वजनिक ठिकाणी लहान मुले एकटी बसलेली दिसली, काही व्यक्ती लहान मुलांसोबत चुकीच्या पद्धतीने वागताना दिसली, तर तातडीने हे स्वयंसेवक हस्तक्षेप करीत संबंधित मुलांना ताब्यात घेतात. तसेच पोलिसांनादेखील त्यांच्या या कामाबद्दल माहिती झाल्यामुळे रात्री लहान मुलांसंबंधी केस आली तर तेदेखील स्वयंसेवकांना माहिती देतात. या मुलांना रात्री ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तातडीने बालगृहात दाखल केले जाते व संबंधित बालकांच्या घरच्यांचा शोध घेणे, पोलिसांकडे एफआरआय नोंदवणे या कामांना सुरुवात होते. दिवसाचे 24 तास अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या नगरच्या चाइल्ड लाइनने 2003 ते 2021 पर्यंत बालकांसंबंधी 14 हजारपेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत.
दि. 23 मार्च 2021 रोजी ग्रुप नाईट राऊंड चे आयोजन करण्यात आले होते.नेहमी प्रमाणे रूट घेऊन हा  ग्रुप नाईट राऊंड झाला . या राऊंड  मध्ये प्रामुख्याने बेवारस बालके आणि महिला यांचा शोध घेण्यात आला. करण खुप प्रमाणात बालके व महिला बेवारस अवस्थेत असल्या कारणाने चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री नंबर मिळत आहे . त्यामुळे हा राऊंड हा उद्देश समोर ठेऊन स्नेहालय मधील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येवर काम करणारे प्रकल्पांना सहभागी करून घेतले होते .  या अनेक बालके व महिला ना  सुरक्षतेच्या ठिकाणी सुखरूप सोडण्यात आले. या ग्रुप नाईट राऊंड ला स्नेहालय संचलित स्नेहकुरचा संचालिका डॉ. प्राजक्ता कुलकर्णी , श्रीम.सपना असावा,  स्नेहधार प्रकल्प समन्वयका प्रियंका सोनवणे आणि स्नेहधार टीम ,  बालभवन च्या प्रकल्प व्यवस्थापिका सौ. शबाना शेख,                         केंद्र समन्वयक श्री. महेश सूर्यवंशी , समुपदेशक अलीम , टीम मेंबर शाहिद शेख , अब्दुल खान , प्रविण कदम , राहुल कांबळे , पूजा पोपळघट, शुभांगी माने आणि स्वयंसेवक राहुल वैराळ यांनी सहभाग नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here