विडी कामगारांना मिळाली मजुरी युनियन आयटकच्या आंदोलनाची दखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 12, 2021

विडी कामगारांना मिळाली मजुरी युनियन आयटकच्या आंदोलनाची दखल

 विडी कामगारांना मिळाली मजुरी युनियन आयटकच्या आंदोलनाची दखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने लालबावटा विडी कामगार युनियन आयटकच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले असून, बागडपट्टी येथील विडी कंपनीने विडी कामगारांना बुधवार (दि.10 मार्च) पासून मजुरी देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर व उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली यांनी दिली.
शहरातील बागडपट्टीत एका विडी कंपनीचे मुख्य कार्यालय असून, कंपनीने विडी कामगारांची मजुरी थकविल्याने त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला होता. विडी कामगार महिलांना उसनवारी करून कुटुंब चालवावे लागत होते. संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेत सदर कंपनीच्या व्यपस्थापकाने दुपारनंतर विडी कामगारांना मजुरी देण्यास सुरुवात केली. मजुरी मिळू लागल्याने विडी कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment