आचार्य आनंदक्रषीजींचे विचार अत्यंत जीवनदायी : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 29, 2021

आचार्य आनंदक्रषीजींचे विचार अत्यंत जीवनदायी : आ. संग्राम जगताप

 आचार्य आनंदक्रषीजींचे विचार अत्यंत जीवनदायी : आ. संग्राम जगताप

राष्ट्रीय संत आचार्य आनंदक्रषी महाराजांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त आनंदधाम येथील समाधीचे दर्शन


अहमदनगर ः
राष्ट्रीय संत आचार्य आनंदक्रषीजी महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. तसेच जैन समाजाचे श्रद्धास्थान आहे. संपूर्ण जगाला अहिंसा, प्रेम व शांतीचा संदेश देऊन धार्मिकतेचे महत्त्व पटवून दिले. आजच्या युवकांना त्यांच्या विचारांतून चांगली प्रेरणा घेऊन उत्तम पिढी निर्माण करण्याची संधी आहे. देशावर आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी रहावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. आनंदक्रषीजींचे विचार अत्यंत जीवनदायी आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रीय संत आचार्य आनंदक्रषी महाराजांच्या 29 व्या पुण्यतिथी निमित्त आनंदधाम येथे जाऊन समाधीचे दर्शन घेताना आ. संग्राम जगताप. समवेत नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपूल शेटीया, माजी नगरसेवक संजय चोपडा, डॉ. विजय भंडारी, बाबुशेठ लोढा, मिलापचंद पटवा, शरद मेहेर, लकी खुबचंदानी, सुभाष पोखर्णा, अनिल दुग्गड, अभिजित खोसे, प्रशांत धाडगे, मळू गाडळकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here