अकोळनेर येथे आजपासून जनता कर्फ्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

अकोळनेर येथे आजपासून जनता कर्फ्यू

 अकोळनेर येथे आजपासून जनता कर्फ्यू नगरी दवंडी

अहमदनगर - दिवसोंदिवस  वाढत चालली कोरोना रूग्ण संख्या पाहता येथील ग्रामस्थांनी चार दिवस कडकडीत बंद पाळण्याचा  (जनता कर्फ्यू )करण्याचा निर्णय घेतला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता गाव  दि.२६ पहाटे सहा ते दि. २९ रात्री बारा वाजेपर्यत बंद राहणार आहे. कोरोना ची संख्या दिवसोंदिवस  वाढत चालली आहे. येथे आज पर्यंत १४० नागरिकाना कोरोना ची लागण झाली. आठ लोकाना जीव गमवावा लागला आहे. सध्या बारा नागरिंकाना कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून गाव स्वयंपुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय गावाकऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत दुध डेअरी चालू राहिल. मेडिकल व दवाखाने फक्त चालू राहणार आहे. गावातील सर्व दुकाने बंद राहणार आहे. गावात कोरोना पासून सरंक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तरी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, विनाकारण फिरू नये असे आवाहन सरपंच दादा कोळगे व उपसरपंच प्रतिक शेळके यांनी केले.

"नगर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे . नागरिकानी काळजी घेण्याची गरज आहे विनाकारण फिरणे टाळावे.  अकोळनेर येथील ग्रामस्थांनी गावपातळीवर गावच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला आहे"

- ज्योती मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here