महेश पवारांची भाजपा कार्यकारिणीत नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

महेश पवारांची भाजपा कार्यकारिणीत नियुक्ती

 महेश पवारांची भाजपा कार्यकारिणीत नियुक्ती

नगरी दवंडी

माका - नेवासे तालुक्यातील अमळनेर येथील, भाजपाचे तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस महेश पवार यांची जिल्हा कार्यकारीणीत युवा मोर्चा उत्तर अहमदनगर सचिवपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली.याबाबतीत युवा मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष श्रीराज डेरे यांनी कार्यकारीणी जाहीर केली.पवार यांचे राजकीय, सामाजिक,धार्मिक कार्यक्रमात सातत्याने योगदान असल्यामुळे कामाची पावती मिळाली असुन,तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच तालुकाअध्यक्ष नितिन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता पक्षाच्या ध्येयधोरणानुसार कामे केली जातील असे यावेळी पवारांनी सांगितले.या निवडीने परिसरातुन आनंदाने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment