कोरोनाच्या उद्रेकात मास्क न वापरणारे लोककर्क, लोककर्कांना सोमवारी स्वयंसेवी संघटनांच्यावतीने मृतांजली वाहून शिमगा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

कोरोनाच्या उद्रेकात मास्क न वापरणारे लोककर्क, लोककर्कांना सोमवारी स्वयंसेवी संघटनांच्यावतीने मृतांजली वाहून शिमगा

 कोरोनाच्या उद्रेकात मास्क न वापरणारे लोककर्क, लोककर्कांना सोमवारी स्वयंसेवी संघटनांच्यावतीने मृतांजली वाहून शिमगा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचा उद्रेक होत असताना, तोंडावर मास्क न वापरणारे लोककर्क असल्याचे जाहीर करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सोमवार दि.29 मार्च रोजी लोककर्कांना मृतांजली वाहून शिमगा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
राज्यातील अनेक नेते, राजकारणी व विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या कोरोना महामारीत मास्क वापरताना दिसत नाही. मास्क वापरणे त्यांना कमीपणाचे लक्षण वाटत आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन कोरोनाचे संक्रमण वाढण्यास मदत होत आहे. हे व्यक्ती लोककर्क असून, इतरांना देखील कोरोना महामारीच्या खाईत लोटणारे सूर्याजी पिसाळ प्रवृत्तीचे असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. लोककर्क ओळखा समाजाला कळवाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनीटायझरचा वापर करुन इतर नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र मास्क न वापरणारे नेते, राजकारणी व विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना सार्वजनिक जीवनापासून लांब ठेवण्याचे व सर्व नागरिकांना मास्क वापरण्यासह नियमांचे पालन करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, जालिंदर बोरुडे आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here