बुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

बुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड

 बुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः तालुक्यातील बुरुडगाव हे नगर शहराच्या अत्यंत जवळचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावची ग्रामपंचायत 15 सदस्यांची असून सर्वात मोठी असल्याने राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची सर्व सदस्यांच्या सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच अर्चना कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक हरिभाऊ येवले यांनी काम पाहिले.
यावेळी सदस्य खंडू काळे, दिलीप पाचारणे, शितल ढमडेरे, ज्योती कर्डिले, अक्षय चव्हाण, माजी सरपंच बापू कुलट, जब्बारभाई शेख, विलास धोत्रे, बाळासाहेब कर्डिले, विलास कर्डिले, सतीश कर्डिले, प्रविण कर्डिले, अमित जाधव, सलीम शेख, रज्ञाक शेख, राजू शेख, बाबासाहेब खाकाळ, संदीप गिरे, सचिन जाधव, दीपक कार्ले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सिराज शेख म्हणाले की, सरपंच अर्चना कुलट यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाला आम्ही सर्वजण चालना देऊन माझ्यासारख्या तरुणाला गावच्या उपसरपंचपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीन.
विकासकामांसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्व सदस्यांना उपसरपंचपदाची संधी देण्याची आमचा प्रयत्न असून त्यानुसार प्रत्येकाला उपसरपंचपदाची संधी मिळत आहे. गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गावपातळीवर आणण्यासाठी आम्ही सदेव प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment