केंद्र सरकारच्या महत्त्वाकाक्षी योजना राबवणारे माजी मंत्री कै. दिलीप गांधी ः कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

केंद्र सरकारच्या महत्त्वाकाक्षी योजना राबवणारे माजी मंत्री कै. दिलीप गांधी ः कर्डिले

 केंद्र सरकारच्या महत्त्वाकाक्षी योजना राबवणारे माजी मंत्री कै. दिलीप गांधी ः कर्डिले

उड्डाण पुलास कै. दिलीप गांधी यांचे नाव देणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  केंद्र सरकारच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहचविण्याचे काम कै.माजी मंत्री दिलीप गांधी यांनी केले. माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेला महत्त्वकाक्षी पंतप्रधान ग्रामसडक योजना यशस्वीपणे राबवून गावासहीत वाड्यावस्त्या डाबरीकरणाने जोडण्याचे काम झाले. त्यामुळे ग्रामीण भागाचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यात कै. दिलीप गांधी यशस्वी झाले. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरू केल्या असून त्याही योजना गावापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले. सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मोफत उज्वला गॅस योजना देशात एक नंबरने आपल्या मतदार संघात राबविण्याचे काम केले. याच बरोबर शहराच्या वैभवात भर पडावी तसेच दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्यमाहामार्गचे रूपातर राष्ट्रीय महामार्गात केले. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला व नगरकरानी उड्डाणपुलाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजूर करून आणला. याचबरोबर बाह्य वळण रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्याची ओळख होती. कुठलाही वारसा नसतांना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती. छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे कै. दिलीप गांधी आज आपल्यात नाही. त्याच्या जाण्याने मनाला फार दुःख झाले आहे. त्याच्या विरोधात मी निडवूक लढवली होती परंतु मला राहुरी मतदार संघातून आमदार होण्यासाठी सहकार्य केले. पक्षनिष्ठा जपणारा नेता आज आपल्यात नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्याच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री कै. दिलीप गांधी यांच्या शोक सभेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे काँग्रेस पक्षाचे नेते विनायक देशमुख, बाजार समिती सभापती अभिलाश घिगे, खरेदी विक्री संघाचे सभापती सुरेश सुबे, नगरसेवक मनोज कोतकर, उपसभापती संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, सुनिल पंडीत, शरद दळवी, दादासाहेब दरेकर, विलास शिंदे, रेवन चोभे, बाळासाहेब निमसे, संतोष कुलट, बबन आव्हाड, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, बहीरू कोतकर, राजेंद्र बोथरा, छत्रपती बोरूडे, राहुल पानसरे, रावसाहेब कर्डिले, अशोक झरेकर, बाबासाहेब खर्से, रभाजी सुळ, शिवाजी कार्ले, जालींदर कदम, मनोज कोकाटे, सचिन सातपुते, संजय काळे आदी उपस्थित होते.
महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, माजी खासदार दिलीप गांधी यांचे उड्डाण पुलावर नाव देण्यासाठी आम्हा सर्वांचे अनुमोदन आहे. पक्षनिष्ठेला महत्त्व देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ध्येय चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपले राजकारण करून समजाचे प्रश्न सोडविले. राज्यासहित जिल्हाभर दांडगा लोकसंपर्क असल्यामुळे लोकप्रिय नेता म्हणून त्यांची ओळख होती. शहर विकासासाठी नेहमी अग्रही भूमिका पार पाडत होते. असे ते म्हणाले.
यावेळी विविध मान्यवरांनी कै. दिलीप गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. विविध मान्यवराच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here