भारतातील प्रोफेशनल ड्राइव्हिंग सेंटरचे आघडीचे नेटवर्क - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

भारतातील प्रोफेशनल ड्राइव्हिंग सेंटरचे आघडीचे नेटवर्क

 भारतातील प्रोफेशनल ड्राइव्हिंग सेंटरचे आघडीचे नेटवर्क

मारुती सुझुकी ड्राइव्हिंग स्कूल ने 1.5 दशलक्षांहून अधिक लोकांना दिले यशस्वी प्रशिक्षण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मारुती सुझुकी ड्राइव्हिंग स्कूल (एमएसडीएस) या भारतातील आघाडीच्या संघटित ड्राइव्हिंग ट्रेनिंग स्कूलने 1.5 दशलक्षांहून अधिक अर्जदारांना यशस्वीरित्या सुरक्षित ड्राइव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. भारतीय रस्ते अधिक सुरक्षित बनवावेत या मूळ उद्देशाने एमएसडीएसची स्थापना करण्यात आली आहे. दर्जेदार ड्रायव्हिंग ट्रेनिंगसाठी यात जागतिक मानांकनांचा समावेश करण्यात आला आहे. अत्याधुनिक ड्राइव्हिंग सिम्युलेटर्स आणि अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या प्रॅक्टिकल आणि थिअर अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या आधुनिक प्रशिक्षण पद्धतीच्या माध्यमातून एमएसडीएसने सातत्याने नवनवे मापदंड रचले आहेत.
या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (विपणन आणि विक्री) कार्यकारी संचालक श्री. शशांक श्रीवास्तव म्हणाले, मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल (एमएसडीएस) ची स्थापना नागरिकांना या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ड्रायव्हिंग ट्रेनिंग देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. भारतभरातील 238 शहरांमधील 492हून अधिक केंद्रांसह ही भारतातील आघाडीची प्रोफेशनल ड्रायव्हिंग स्कूल चेन ठरली आहे. एमएसडीएसमध्ये शिकणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ड्रायव्हिंगची कौशल्ये शिकवतानाच गाडीची प्राथमिक देखभाल आणि आपातकालीन स्थितीत गाडी कशी हाताळावी याचे परिपूर्ण ज्ञानही दिले जाते. मला हे सांगताना आनंद होत आहे की एमएसडीएसच्या माध्यमातून आम्ही 1.5 दशलक्ष लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये प्रशिक्षित केले आहे. ड्रायव्हिंगचे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान देण्याची आमची बांधिलकी या कामगिरीतून अधोरेखित होते.
एमएसडीएसमध्ये हायब्रिड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण दिले जाते. यात तज्ज्ञांनी दिलेल्या ऑन-रोड ड्रायव्हिंग आणि क्लासरूम ट्रेनिंगचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना रस्त्यावरील आपले वर्तन, डीफेन्सिव्ह ड्रायव्हिंग, उत्तम नागरिक कायदा, ट्रॅफिकचे नियम आणि नियमन अशा अनेक गोष्टींबाबत हे तज्ज्ञ प्रशिक्षण देतात. एमएसडीएसतर्फे उपलब्ध अभ्यासक्रमात प्रत्येक अर्जदाराच्या गरजांनुसार वैयक्तिक वैशिष्ट्ये असतात. 2020 मध्ये एमएसडीएसने रस्त्यांवर अधिक सराव हवा असणार्‍या अर्जदारांसाठी नवा वैयक्तिक स्वरुपाचा कोर्स सादर केला. नव्या आणि तरुण प्रशिक्षणार्थींसाठी विविध उपक्रम राबवण्यासोबतच एमएसडीएस विविध कॉर्पोरेट्स, फ्लिट मालक यांच्यासोबत सहकार्य करून त्यांच्या विविध गरजांनुसार कार्यक्रमांचे आयोजन करते. अर्जदारांना वाहनचालक परवाना मिळवण्यात साह्य, गाडी घेण्यात साह्य अशा मूल्यवर्धित सेवाही दिल्या जातात. डिजिटायजेशनमधील स्थित्यंतराला अनुसरून एमएसडीएससाठी खास तयार करण्यात आलेले मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइटही टेकस्नेही ग्राहकांचा अनुभव वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे, ग्राहकांना थिअरी अभ्यासक्रम घरून त्यांच्या सोयीने शिकता यावा यासाठी अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइटवर नवा डिजिटल कंटेंट उपलब्ध करून देण्याचाही एमएसडीएसचा मानस आहे. एमएसडीएस आरटीओ, ट्रॅफिक पोलिस, विविध एनजीओ आणि सेल्फ-हेल्प ग्रूपसोबत लोकांमध्ये जागरुकता आणणे आणि रस्त्यांवरील धोके कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here