कोरोना काळात नागरिकांच्या जीवाशी खेळात आहेत नगर मधील या बँकेचे मॅनेजर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

कोरोना काळात नागरिकांच्या जीवाशी खेळात आहेत नगर मधील या बँकेचे मॅनेजर

 कोरोना काळात नागरिकांच्या जीवाशी खेळात आहेत नगर मधील महाराष्ट्र बँकेचे मॅनेजर

मुख्यमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते संदुपटला यांची तक्रार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सद्या पुन्हा कोरोनोचा आजाराबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना चितळी रोड वरील महाराष्ट्र बँक शाखेत कोणतीही दक्षता घेतली जात नाही हे निदर्शनास येत आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक व चिंताजनक आहे. ग्राहकांच्या जिविताशी ते खेळत आहेत कोणत्याही प्रकारची सरकारची सूचना या शाखेत अमलात आणलेली नाही ही सुद्धा गंभीर बाब आहे. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सर्वांना या बाबत अवगत केले आहे तरी सुद्धा या बँकेच्या शाखेत या सूचनांना केराची टोपली दाखवली गेली असे दिसून येते. शाखेत सोशल डिंस्टनसिंग पालन केलं जातं नाही व त्या साठी काही सूचना नाही, शाखेत सिक्युरिटी गार्ड नाही, एकाच वेळी मोठ्या संख्येने ग्राहकांना शाखेत प्रवेश दिला जातो, पुरेसा स्टाफ नाही त्यामुळे ग्राहकांची मोठी मोठी रांग या सर्व गोष्टी खूप भयानक परिस्थितीला आमत्रण देऊ शकते व संपूर्ण अहमदनगर शहराला याचा परिणाम भोगावा लागेल व याला जबाबदार आपण आहे हे लक्षात घ्यावे अशा प्रकारची तक्रार मेल द्वारे सामाजिक कार्यकर्ते सुरज कैलास संदुपटला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here