मुख्यमंत्र्यांची दखल, आज जिल्हा, प्रशासनाशी साधणार ऑनलाईन संवाद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

मुख्यमंत्र्यांची दखल, आज जिल्हा, प्रशासनाशी साधणार ऑनलाईन संवाद.

 मुख्यमंत्र्यांची दखल, आज जिल्हा, प्रशासनाशी साधणार ऑनलाईन संवाद.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडलेल्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांत वाढलेली नागरिकांची गर्दी, कोरोना संपलाय हा झालेला गैरसमज, मुंबई, पुणे, औरंगाबाद इ. शहरांतून नागरिकांचे आगमन इ. कारणांमुळे नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. नगरच्या शेजारील औरंगाबाद प्रशासनाने लॉकडावऊन लागू करण्याचा घेतलेला निर्णय या पार्श्वभूमूवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सायंकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, जिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. नगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नाईट कर्फ्यू अधिक कडक करून जिल्ह्यात आणखी निर्बंध लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या ऑनलाईन बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहमदनगर शहरातही  कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणार्‍यांवर, तसेच गर्दी करणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाने आता नटराज कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे.
अहमदनगरमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकार्‍यांबरोबर मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधणार आहे. त्यामुळे या बैठकीमधील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. नगर शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे.बाधितांची वाढती संख्या महापालिका प्रशासनासह प्रत्येकाचीच डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे. प्रशासनाकडून वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात असताना अनेक बेजबाबदार नागरिक नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहे. कोरोनाची संख्या जानेवारी 400 पर्यंत कमी झाली होती. परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संख्या झपाट्याने वाढून 938 झाली. तर मागील सहा दिवसांत ही संख्या आता 500 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात नव्याने 157 रूग्ण आढळून आले आहेत. नगरच्या शेजारील औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगरमधील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचा वेग पाहिल्यास बरीच सारखी आहे. त्यामुळे सायंकाळी होणार्‍या बैठकीकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्याशी आज सायंकाळी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक आहे. शहरासह जिल्ह्यात वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या बैठकीत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाची संसर्गसाखळी तोडण्याचे आव्हान आरोग्ययंत्रणेसमोर आहे, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here