घोड्यांना अमानुषपणे चाबकाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

घोड्यांना अमानुषपणे चाबकाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल !

 घोड्यांना अमानुषपणे चाबकाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल !

कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग; लावली घोड्यांची शर्यत..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून घोड्यांची शर्यत लावून घोड्यांना चाबुकाने क्रूरपणे मारहाण करणार्‍या बंडू बडे, रावसाहेब बडे रा. मेहकरी, प्रकाश मच्छिंद्र पोटे रा. बारदरी, यांचे विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सचिन गायकवाड यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की काल रविवारी सकाळी 9च्या सुमारास नगर-कल्याण रोडवरील हिंगणगाव फाटा येथे जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिबंधात्मक आदेश असताना घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती यावेळी घोडे वेगाने पाळावेत व आपल्याच घोड्याचा पहिला नंबर लागावा यासाठी घोडा वेगाने पळावा म्हणून अमानुषपणे मारहाण करण्यात येत होती. घोडे वेदनेने ओरडत होते तरीही घोड्यांना चाबकाने जोरदार फटके मारले जात होते. हा निर्दयीपणा इतका बेफाव होता की रस्त्यावरील प्रवासी नागरिकही हळहळ करीत होते. एमआयडीसी पोलिसांना फोनद्वारे ही माहिती देण्यात आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी कार्यवाही करत आरोपींकडून 15 हजार रुपयांचा दोन चाकांचा . एक टांगा, 20 हजार रुपयांचा स्टीलच्या धातूचा टांगा व 25 हजार रुपयांचा नारंगी रंगाचा लोखंडी टांगा असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लाळगे हे करत आहेत.
तीन आरोपींनी मोटरसायकल वरील दहा ते बारा जणांनी घोड्याला टांग्याना जुंपत शर्यत लावली. घोडे वेगाने पडावेत यासाठी हातातील चाबकाने त्यांना क्रूरपणे मारहाण करून निर्दयतेने वागणूक दिली. तसेच प्रतिबंधात्मक आदेश जुमानला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment