राज्यात शेतकर्‍यांच्या जमिनी काढुन घेण्याचे षड्यंत्र- बारसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

राज्यात शेतकर्‍यांच्या जमिनी काढुन घेण्याचे षड्यंत्र- बारसे

 राज्यात शेतकर्‍यांच्या जमिनी काढुन घेण्याचे षड्यंत्र- बारसे

वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रात आज शेतकर्‍यांच्या जमीन काढून घेण्याचे षड्यंत्र सुरू असून यामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब मराठा समाजाचे होणार आहे. गरीब मराठा समाजाला या तीन कृषी विरोधी कायद्यांमुळे भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडी या शोषणाविरुद्ध अनेक दशकापासून लढते आहे, म्हणूनच श्रीमंत मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी व त्यांच्या पक्षांनी वंचित बहुजन आघाडी ला कायम मराठा समाज विरोधी असे चित्र उभे केले आहे. जे फसवे आणि दिशाभूल करणारे आहे. जात-धर्म न बघता वंचित बहुजन आघाडी समाजातील अन्याय शोषणाच्या विरोधात कायम संघर्षशील आहे आणि राहील. महाराष्ट्रातील पाच एकराच्या आधी शेतकरी भूमिहीन होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्या बाजूने लढत आहे. तसेच आता घरी मराठा समाजाने व मराठा इतर समाजाने आंदोलन मध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे पारित केलेल्या त्या विरोधात दिल्ली येथे गेल्या काही दिवसापासून मोठ्या संख्येने उत्तर भारतातील शेतकरी वर्ग हा आंदोलन करीत आहे,त्याच्या समनार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले.
 वंचित आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बोरसे यावेळी म्हणाले की श्रीमंत मराठ्यांचे प्रतिनिधी हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे, याच कारणास्तव त्यांनी गरीब मराठ्याला प्रगती करण्याची संधी दिली नाही, उलट त्याला त्रासाताच ठेवण्यात धन्यता मानली आणि त्याची समस्या अधिक वाढावी यासाठी 2006 ला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने गरीब मराठ्यांना उध्वस्त करणार विधेयक आणलं. आम्ही नुसते आरोप करीत नाही तर पुरावे सह बोलत आहोत, मोदी सरकारने आज जे शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत, त्यामध्ये आम्ही भावाची तरतूद नाही कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याची तरतूद आहे आणि सावकार च्या जागी करार शेतीची संकल्पना त्यांनी आणली आहे. याविरोधात उत्तर भारतातील शेतकरी आंदोलन करीत आहे दुसरीकडे महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांच्या पुळका असल्याचे दाखविण्यासाठी या विधेयकाच्या विरोधात सर्वत्र आंदोलन करीत आहे.यातून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
यावेळी पक्षाची भूमिकेबाबत मा.प्रकाश आंबेडकर साहेब समस्त शेतकरी बंधूंना म्हणतात की, महाराष्ट्रातील एकूण शेतीतील 80% जमिनी या मराठा समाज आपले आहे आणि उरलेल्या शेती मराठी तर इतर समाज बांधवांकडे आहे. मराठा समाजापैकी पुन्हा 65% शेतकर्‍यांकडे एकरी जमीन धारणा 5 एकराच्या आत आहे व उर्वरित 15% जमीन श्रीमंत मराठा समाजाकडे आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील 65% मराठा समाजाकडे 5 एकराच्या आतील जमीन आहे व तो गरीब आहे आणि तो प्रचंड अस्वस्थ आहे व संघर्ष करीत आहे, म्हणूनच या संघर्षाला गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असे प्रकाश आंबेडकरांनी संबोधले आहे. यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा सचिव बाळासाहेब कांबळे, किसन पारधे,डॉ.अनुराधा मेचे,ड.पुष्पा जेजुरकर,ड.नीलंबरी गायकवाड,  संघटक फिरोज पठाण,मारुती पाटोळे,भाऊ साळवे,अमर निरभवणे,गौतम आढाव,सचिन गायकवाड,मनोहर जिंदम,आकाश लोखंडे, अजय शिंदे, अभिषेक बारसे,सुनील भिंगरदिवे, रतन आल्हाट, संजय जगताप,संतोष आल्हाट,शेख अब्दुल आदीसह कार्यकर्ते व नगर तालुक्यातील शेतकरी बंधू उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here