पारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 29, 2021

पारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा....

 पारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा....

पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे  अध्यक्ष काशिनाथ दाते सर यांची माहिती...नगरी दवंडी


पारनेर - पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २८ मार्च २०२१ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाईन पार पडली वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रखमाजी कापसे सर यांनी केले. संस्थेचे मागील सभेचे प्रोसिडिंग मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी वाचन केले संस्थेचे संस्थापक,चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले यावेळी ते म्हणाले की संस्थेकडे मार्च २०२० अखेर १३६ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेले आहेत. संस्थेच्या ठेवीमध्ये मागील आर्थिक वर्षात १९ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या ठेवी वाढलेले आहेत. तसेच संस्थेने सभासदांना मार्च २०२० अखेर ८९ कोटी ६८ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. संस्थेला मागील आर्थिक वर्षात १ कोटी ५५ लाख रुपये नफा झालेला आहे. संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे. संस्थेच्या सतरा शाखा असून पारनेर ,टाकळी ढोकेश्वर, जामगाव ,कामोठे, खडकवाडी ,शिरूर ,आळेफाटा व सुपा येथील शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत संस्थेचे ४ हजार २९६ सभासद आहेत. तसेच संस्थेने जिल्हा सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक व शेड्युल्ड बँक एकत्रित ५० कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे १५४ कोटी ४८ लाख रुपयांचे खेळते भांडवल आहे. अल्पावधीतच विश्‍वासार्हता निर्माण करून संस्थेने आर्थिक प्रगती साधली आहे . संस्थेमार्फत ग्राहकांना आरटीजीएस सुविधा, कोर बँकिंग सुविधा तसेच अ वर्ग सभासदांना एक लाख रुपयांचा विमा ही संस्थेच्या वतीने उतरविण्यात आला आहे. सर्व ऑनलाइन उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे संचालक सुरेश बोरुडे सर यांनी मानले . याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब सोबले, संचालक सर्वश्री रखमाजी कापसे सर, लक्ष्मण डेरे, मयुर गांधी, सुरेश बोराडे सर, अर्जुन गाजरे ,राजेंद्र औटी,  शिवाजी काळे, सुभाष राठोड ,कृष्णा उमाप ,सुनील गाडगे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात व मुख्य कार्यालय व सतरा शाखांमधील कर्मचारी व सभासद ऑनलाईन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here