काळे महिला महाविद्यालयात राज्यस्तरीय बौद्धिक मालमत्ता अधिकार कार्यशाळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

काळे महिला महाविद्यालयात राज्यस्तरीय बौद्धिक मालमत्ता अधिकार कार्यशाळा संपन्न

 काळे महिला महाविद्यालयात राज्यस्तरीय बौद्धिक मालमत्ता अधिकार कार्यशाळा संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष व महाविद्यालय संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयात दि. 13 मार्च रोजी ऑनलाइन राज्यस्तरीय  बौद्धिक मालमत्ता अधिकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  बीजभाषक म्हणून  वोक्हार्ट संशोधन केंद्र औरंगाबाद, येथील डॉ. मंगेश पवार, विभागप्रमुख, ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, हे उपस्थित होते.
 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. डॉ. मंगेश पवार यांनी आपल्या बीजभाषणात बौद्धिक मालमत्ता अधिकार म्हणजे काय? कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क याविषयी माहिती सांगितली.
यावेळी ते म्हणाले की वाड:मय चोरीपासून संशोधकांनी काळजी घेतली पाहिजे. बौद्धिक मालमत्ता अधिकाराचे संरक्षण व्हावे, यासाठी विविध कायद्यांची माहिती देऊन कॉपीराईटचे महत्त्व विशद केले. तसेच बौद्धिक मालमत्ता अधिकार मिळवण्यासाठी फाईल कशी करावी? पेटंट कशाचे करता येते? याची माहिती सांगितली. बौद्धिक मालमत्ता धारकाला रॉयल्टी मिळते, या  मालमत्ता विकता येतात व पुढच्या पिढीकडे त्या सोपविता येतात.
कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयविषयी माहिती सांगितली. तसेच बौद्धिक मालमत्ता अधिकार का गरजेचा आहे? व कार्यशाळेचे आयोजन का करण्यात आले? याविषयी माहिती विशद केली.
प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील संशोधन केंद्र समितीचे समन्वयक डॉ. मुबारक शेख यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष समन्वयक प्रा. रिजवान खान यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपाली एंडाईत यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नासीर सय्यद, उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे, , शिक्षक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेस 261 जणांनी सहभाग नोंदविला.

No comments:

Post a Comment