चिकित्सकदृष्टी ठेवून सर्व क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे ः प्रा.गावडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

चिकित्सकदृष्टी ठेवून सर्व क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे ः प्रा.गावडे

 चिकित्सकदृष्टी ठेवून सर्व क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे ः प्रा.गावडे

गुगळे हायस्कूलमध्ये मराठी भाषा, विज्ञान दिन व वसुंधरा सप्ताह साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पर्यावरणाचा होत चालेला र्हास ही सर्वांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. या पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सरकार, सामाजिक संस्था यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करुन आपणही त्यात सहभागी होऊन हातभार लावला पाहिजे. विज्ञानाने मनुष्याची प्रगती झाली आहे, आज आकाश, पाताळ, मेडिकल आदिंसह विविध क्षेत्रात होत असलेले क्रांतीकरक बदल हे विज्ञानाची देण आहे. मोबाईल हा त्याचाच एक भाग आहे, परंतु त्याचा वापर कामापुरताचा झाला पाहिजे. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात भाषाची होत असलेली तोडफोड चिंताजक असून, आप आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषेला मोठी संत, कवी, साहित्यीकांची परंपरा असून, ती समृद्ध करण्यासाठी अनेकांचे योगदान लाभले आहे. आपणही मराठीचा सन्मान केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमीच चिकित्सक दृष्टी ठेवून अभ्यास करुन सर्वक्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलच्या प्राचार्या कांचन गावडे यांनी केले.
मराठी राजभाषा दिन व माझी वसुंधरा अभियानानिमित्त श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात  विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या कांचन गावडे, ज.ग.उंडे, पांडूरंग मिसाळ, सु.ब.भापकर, वि.च.सावळे, उज्वला सूर्यवंशी, सु.स.पवार, प्र.रं.सुरसे, आशा वरखडे, दत्तात्रय कसबे आदि उपस्थित होते.
यावेळी माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ तसेच मराठी राजभाषा दिन व जागतिक विज्ञान दिन असा त्रिवेणी संगम कार्यक्रम एकत्रित घेण्यात आला. यावेळी वि.वा.शिरवाडकर तथा कुसूमाग्रज व क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. यावेळी शास्त्राज्ञ व त्यांनी लावलेले शोध या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजयकुमार मुनोत आदिंसह सर्व विश्वस्तांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सु.ब.भापकर यांनी केले तर सूत्रसंचालन आशा वरखडे यांनी केले. शेवटी आभार दत्तात्रय कसबे यांनी मानले.  यावेळी ब.भा.माताडे, क्षी.मा. कानडे, चां.रा.कोर्हाळे. वि.सा.खोसे, दि.स.रोंगे आदिंसह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवृंद  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here