रविदास महाराजांचे मंदिर भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरणार ः पोटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

रविदास महाराजांचे मंदिर भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरणार ः पोटे

 रविदास महाराजांचे मंदिर भावी पिढीला प्रेरणा देणारे ठरणार ः पोटे

निंबोडीला संत रविदास महाराज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः संत रविदास महाराज यांच्या 644 व्या जयंती निमित्त निंबोडी (ता. नगर) येथे चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने संत रविदास महाराज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. देवराम पोटे यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन पार पडले. यावेळी हभप अभंग महाराज सोमवंशी यांनी आपल्या प्रवचनातून संत रविदास यांचे कार्य व विचार ग्रामस्थांपुढे मांडले.
जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी संत रविदास महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे आहे. त्यांनी समाज जागृतीचे कार्य करुन समाजात समता प्रस्थापित करण्याचे कार्य केले. त्यांचे मंदिर भावी पिढीला प्रेरणा देणार असल्याचे सांगितले.
यावेळी निंबोडी गावचे सरपंच शंकर बेरड, चर्मकार संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष उदमले, जय मल्हार कुस्ती संकुलाचे वस्ताद भाऊसाहेब धावडे, बाळासाहेब केदारे, कैलास सरपसरीवश, देवराम पोटे, भगवान बेरड, मधुकर शेटे, रामदास दळवी, सुरेश पोटे, प्रकाश आघावणे, शंकर पोटे, आकाश पोटे, संदीप पोटे, सचिन पोटे, किसन पोटे, गणेश पोटे, विकास पोटे, श्रीपत पोटे, गोवर्धन काळे, सुनील पोटे, पांडुरंग शेंडगे, प्रदीप पोटे, शिवाजी गाडे, तुकाराम गाडे, निलेश पोटे, पोपट पोटे, शंकर दळवी, भाऊसाहेब गाडे, संतोष पोटे, महादेव पोटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here