डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्यावतीने वीरपत्नी कांताबाई फलके यांचा महिला दिनानिमित्त गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्यावतीने वीरपत्नी कांताबाई फलके यांचा महिला दिनानिमित्त गौरव

 डोंगरे बहुद्देशीय संस्था व नवनाथ युवा मंडळाच्यावतीने वीरपत्नी कांताबाई फलके यांचा महिला दिनानिमित्त गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वीर पत्नी कांताबाई फलके यांचा महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, बापू फलके, अनिल फलके, भाऊसाहेब फलके, दिलावर शेख, जावेद शेख, शब्बीर शेख, युवराज भुसारे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, ह.भ.प. गायकवाड महाराज, अन्सार शेख, बापू फलके, गुड्डू शेख, सुभाष जाधव, हिरामन केदार आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, सिमेवर असणार्या सैनिकांचे कार्यकर्तृत्व व त्यांच्या देशभक्तीला तोड नाही. त्यांचे उपकार न फेडता येणार आहे. शहिद झालेले सैनिक कधीच मृत्यू नसतात तर ते अजरामर होतात. वीर पत्नी व माता समाजाचे भूषण असून, त्यांचा संघटनेच्या वतीने महिला दिनी सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment