प्रभागात मूलभुत सुखसोयी मिळण्याकरता सर्वच नगरसेवक प्रयत्नशील- अनिल शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

प्रभागात मूलभुत सुखसोयी मिळण्याकरता सर्वच नगरसेवक प्रयत्नशील- अनिल शिंदे

 प्रभागात मूलभुत सुखसोयी मिळण्याकरता सर्वच नगरसेवक प्रयत्नशील- अनिल शिंदे

प्रभाग क्र.8 आणि 15 मधील 450 व 300 एमएम बंद पाईप गटाराचे उद्घाटन समारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभागात मूलभुत सुखसोयी कश्या मिळतील याकडे प्रभागातील सर्वच नगरसेवक सातत्याने प्रयत्न करत असतात. 450 एम एम व 300 एम एम बंद पाईप टाकून गटारीचे आता  काम सुरू होत आहे. यामुळे नागरिकांचे ड्रेनेजची समस्या मिटतील यानंतर रस्ते व पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे.विदया कॉलनीत मूलभुत सोयी देउन विदया कॉलनीचे नंदनवन करणार आहे.असे प्रतिपादन नगरसेवक अनिल शिंदे यांनी केले.
नगरसेवक अनिल शिंदे सचिन शिंदे प्रशांत गायकवाड यांच्या निधीतून प्रभाग नंबर आठ आणि पंधरा मधील 450 एम एम व 300 एम एम बंद पाईप गटाराचे उद्घाटन (उद्धव अ‍ॅकडमी ते सातपुते सर यांच्या घरापर्यंत ते इंजिनियर सोनवणे यांच्या घरापर्यंत 450 बंद पाईप गटार,इंजि.सोनवणे ते चौधरी सर यांच्या घरापर्यंत 300 बंद पाईप गटार,डी.पी.रोड ते वाघमारे सर तसेच पिंपळे सर ते नाईक सर यांच्या घरापर्यंत 450 एम एम बंद पाईप गटार, वाघमारे सर ते पांढरे सर तसेच भाऊसाहेब डेरे यांच्या घरापर्यंत 300 एम एम बंद पाईप गटार यांचे एकत्रित) नगरसेवक अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, दत्ता जाधव, दिपक खैरे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष पारूनाथ ढोकळे सर आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम कल्याण रोडवरील विदया कॉलनीतील राजापुरे ते पटेल सर यांच्या घराजवळ घेण्यात आला.
अनिल बोरूडे म्हणाले की,सातत्याने प्रभागाचा विकासाकरीता प्रयत्न करत आहे.70 टक्के कामे मंजूर झाली आहेत. येत्या काळात सर्व कामे पुण करणार आहोत.
शाम नळकांडे म्हणाले की,ज्या जबाबदारीने तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला व आम्हाला निवडून दिले त्या विश्वास पात्र राहत आम्ही प्रभागातील कामे पुण करत आहोत. सचिन शिंदे म्हणाले की, कल्याण रोड प्रभागातील स्थानिक प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. याकरीता प्रभागातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. अ‍ॅड. सतीश गीते, लक्ष्मण मांडगे, गणेश राजापुरे, शांताराम पिंपळे, हिरामन गुंड, जयप्रकाश दीडवानिया, दत्तात्रेय कर्डिले, भाऊसाहेब पांढरे, प्रशांत काकडे, अतुल काकडे, दिनकर आघाव, संतोष चौधरी, दत्ताराम सहानी, संजय साठे, सचिन ठाणगे, संतोष ठाणगे, लगड काका, ज्ञानदेव मुकणे, संजय सोनवणे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब मुर्तडक, अंबादास जमदाडे, बबन खैरे, संतोष कोरडे, भाऊसाहेब डेरे, भास्कर महांडुळे, नवनीत गायकवाड, अविनाश पांढरे, शेखर उंडे, केशव दसासे, सुशील नन्नवरे, विठ्ठल सुरम, संजीव सातपुते, राजाराम वाघमारे, प्रमोद घोडके, विठ्ठल हंबर्डे, नितीन वाघमारे, हरिभाऊ चव्हाण, महादेव नाईक, वसंत खोसे, विनायक आडेप, मदन काशीद, उत्तमराव राजळे, भाऊसाहेब सोनवणे आदीसह यावेळी विदया कॉलनी परीसरातील सर्व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here