स्वाक्षरी किंवा हस्ताक्षरात योग्य बदल केल्यास जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण शक्य ः मुनोत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

स्वाक्षरी किंवा हस्ताक्षरात योग्य बदल केल्यास जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण शक्य ः मुनोत

 स्वाक्षरी किंवा हस्ताक्षरात योग्य बदल केल्यास जीवनातील  समस्यांचे निराकरण ः मुनोत

जितो लेडीज विंगतर्फे ‘पेन स्पिक्स ब्रेन ; आर्ट ऑफ ग्राफोलॉजी’ विषयक मार्गदर्शनपर सेमिनार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्वाक्षरी किंवा तुमचं हस्ताक्षर हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. आधुनिक विज्ञानातही ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. विशेषतः आपली मानसिक स्थिती, आपला स्वभाव याच्याशी हस्ताक्षर थेट जोडलेले असते. ग्राफोलॉजी हे हस्ताक्षर पाहून व्यक्तीमत्व समजण्याचे शास्त्र आहे. याद्वारे स्वताच्या हस्ताक्षरात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चांगले बदल केल्यास जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते, असे बहुमोल मार्गदर्शन नगरमधील ग्राफोलॉजीस्ट तथा हस्ताक्षर तज्ज्ञ साक्षी मुनोत यांनी केले.
जितो अहमदनगर लेडीज विंग च्यावतीने अध्यक्षा मेघना मुनोत यांच्या विशेष पुढाकाराने केशर गुलाब मंगल कार्यालयात नुकतेच हस्ताक्षर विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेतून ग्राफोलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या साक्षी मुनोत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास  जितो लेडीज विंगच्या अध्यक्ष मेघना मुनोत, सेक्रेटरी संगिता मुथियान,  सीमा मुनोत, मंजू मुनोत, ममता बोगावत, प्रिती नहार, अंशु मुनोत, शितल मुनोत, अंजली मुनोत, प्रेमलता मुनोत, दीपाली मुथा, रीना मुनोत, प्रिया मुनोत, अमिता मुनोत, वैशाली ओस्तवाल, भावना शिंगवी, स्वाती भटेवडा, प्रिती बोरा, शर्मिला गुगळे, जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सेक्रेटरी प्रितेश दुगड,   गौतम मुथा, आलोक मुनोत, कमलेश मुनोत, रोहित लुणिया, सौरभ भंडारी
आदींसह लेडीज विंग, युथ विंगचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शर्मिला गुगळे यांच्या नवकार मंत्राने झाली.
साक्षी मुनोत यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करताना सांगितले की, मेघना मुनोत यांच्यामुळे या महत्वपूर्ण विषयांवर संवाद साधण्याची संधी मला मिळाली.  अनेकदा कोणत्यातरी कारणाने आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. मुलांचे अभ्यासात लक्ष नसते. या गोष्टींवर हस्ताक्षरात किंवा स्वाक्षरीत थोडेसे बदल करून सहज मात करता येणं शक्य आहे.
अनेक प्रगत देशात तसेच भारतातही आता ग्रॉफोथेरपीचा वापर चारित्र्य सुधारण्यासाठी केला जातो. ही हस्ताक्षराच्या माध्यमातून व्यक्तीत्व सुधारण्याची थेरपी आहे. ही पूर्णतः वैज्ञानिक पद्धती असून याचा अनुभव एकदा तरी घ्यायला हवा. मुनोत यांनी हस्ताक्षराचे वळण, सह्यांचे प्रकार यावरून व्यक्तीमत्व कसे असते हे प्रात्यक्षिकासह दाखवून दिले.
स्वागत करताना मेघना मुनोत यांनी सांगितले की, साक्षी मुनोत या प्रोफेशनल ग्राफोलॉजीस्ट असून या क्षेत्रातील शिक्षण त्यांनी अमेरिका व भारतात घेतलं आहे. हस्ताक्षर व स्वाक्षरीतून स्वभाव गुण, मानसिकता ओळखण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच हस्ताक्षर किंवा स्वाक्षरीत सकारात्मक बदल करण्याबाबतही त्या सखोल मार्गदर्शन करतात.
या कार्यक्रमाला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेवटी संगिता मुथियान यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here