जिद्द व चिकाटीमुळे पुर्वजाला यश प्राप्त करता आले -आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

जिद्द व चिकाटीमुळे पुर्वजाला यश प्राप्त करता आले -आ. संग्राम जगताप

 जिद्द व चिकाटीमुळे पुर्वजाला यश प्राप्त करता आले -आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गंभीर दुखापत झालेली असतांना केवळ इच्छाशक्ती व मेहनत यामुळें यशापर्यंत जाता येते. पूर्वजाला मिळालेले यश यामुळेच निश्चितच कौतुकास्पद असून अहमदनगर शहरच नव्हे तर जिल्हासाठी भूषणावह आहे. या पुढे तिने कथक पदवीका परीक्षे मध्ये जास्तीत श्रम घेऊन शहरातील व जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील विदयार्थ्यांना घडवावे.नगर शहर सांस्कृतिक क्षेत्रात आपला लौकिक सर्वदूर नेत असुन. पूर्वजाने केलेली कामगिरी नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन आ संग्राम जगताप यांनी केले. कथक पदवीका परीक्षेत टिळक विद्यापीठात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळाल्या बद्दल कु पूर्वजा बोज्जा  हिचा आ. संग्राम जगताप यांनी सत्कार केला.  यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, संदीप रोडे, प्रा. सीताराम काकडे, सुरेश बोज्जा, सौ. शशिकला बोज्जा, संतोष ढाकणे, मा. नगरसेविका वीणा बोज्जा, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा, अथर्व बोज्जा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here