प्रविण आटोळे यांची विद्यापीठाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

प्रविण आटोळे यांची विद्यापीठाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड

 प्रविण आटोळे यांची विद्यापीठाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा येथील विद्यार्थी प्रविण सुखदेव आटोळे यांची डॉ.बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाली.
   सामाजिक कार्या बद्दलची आवड, बांधीलकी , राष्ट्रीय सेवा योजना बद्दलची आस्ता व समाज सेवेतील अनुभव पहाता मा.कुलगुरू  महोदयांनी याची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीच्या सदस्य पदि नियुक्ती केलेली आहे.
   त्याच्या निवडी बद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व प्राचार्य एच.जी.विधाते, उप प्राचार्य बी.एम.वाघुले, कार्यक्रम अधिकारी.प्रा.बी.एम .चव्हान ,प्रा.आर.जी. विधाते व प्रध्यापक वर्ग  व वाहिरा ग्रामस्थांच्या वतीने  कौतुक केले व शुभेच्छा  देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment