अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने उन्हापासून बचाव करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना टोप्या वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने उन्हापासून बचाव करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना टोप्या वाटप

 अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने उन्हापासून बचाव करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना टोप्या वाटप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एकीकडे कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा बचाव करत बातमीदारी करणार्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा उन्हापासून बचाव व्हावा या हेतूने अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले आहे.
   ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता माध्यमांचे प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक अपडेट, माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवीण्यासाठी कार्य करीत आहे. सध्या मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाले असताना उन्हापासून संरक्षण व्हावे या भावनेने माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष उमेर सय्यद, कुणाल जायकर, लैलेश बारगजे, रोहित वाळके, निखिल चौकर, सुशील थोरात, सागर दुस्सल, सचिन अग्रवाल, महेंद्र पाठक, आमीर सय्यद, मोहसीन कुरेशी आदी उपस्थित होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक आहे. कडक उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत आहे. दिवसंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना माध्यमांचे प्रतिनिधींना बातमीसाठी उन्हात बाहेर जावे लागते. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment