प्रकाश भंडारे यांचा पत्रकारितेत तीन पिढ्यांशी घनिष्ठ संबंध- सुभाष गुंदेचा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

प्रकाश भंडारे यांचा पत्रकारितेत तीन पिढ्यांशी घनिष्ठ संबंध- सुभाष गुंदेचा

 प्रकाश भंडारे यांचा पत्रकारितेत तीन पिढ्यांशी घनिष्ठ संबंध- सुभाष गुंदेचा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
नगरमधील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे यांची गेल्या 50 वर्षांपासूनची पत्रकारिता या काळात तीन पिढ्यांनी अनुभवली आहे. आचार्य गुंदेचा यांचे ते प्रथम मित्र होते. त्यांचा माझ्याशी जसा पत्रकार म्हणून संबंध आहे तसा ललित गुंदेचा यांच्याशी ते पत्रकारिता म्हणून संवाद साधतात, असे पूर्णवेळ पत्रकारिता करणारे हे आगळे-वेगळे व्यक्ती आहे’ असे मत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व शहर सह. बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा यांनी व्यक्त केले.
    पत्रकार श्री.भंडारे यांचा 71 वा वाढदिवस आज छोटेखानी समारंभात पत्रकार कॉलनीत साजरा झाला. यावेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून श्री.गुंदेचा बोलत होते. यावेळी जागरुक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, हास्य क्लबचे मुख्याध्यापक संघाचे सुनिल पंडीत, प्रा.विजयकुमार पोटे, माजी तलाठी शंकरराव सांगळे, शिवराष्ट्र सेनेचे प्रदेशाध्यक्ष भैरवनाथ खंडागळे, मठ-मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे, प्राचार्य विठोबा चौधरी-अमरापूकर, शिरसाठ सर, अभय गुंदेचा, रघुनाथ चौरे, दत्तोबा कुलथे सराफ, पत्रकार मकरंद घोडके व देवीप्रसाद अय्यंगार आदि उपस्थित होते.
    श्री.प्रकाश भंडारे यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी विविध समस्या अत्यंत हिरीरीने मांडून वर्तमान पत्रातून त्याला वाचा फोडली. राजकीय बातमीपत्र हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ठ्ये होते. आजही अनेक वर्तमान पत्राच्या कार्यालयातून संदर्भासाठी श्री.भंडारे यांच्याकडे विचारणा होते. आणि तेही त्यांना माहिती असलेले संदर्भ तात्काळ सांगतात. त्यामुळे त्यांचा 71 व्या वर्षी पत्रकारितेशी संबंध राहिला, असे विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
   सत्काराला उत्तर देतांना प्रकाश भंडारे म्हणाले, ‘तिन्ही वार्ता’ ‘युएनआय’ या वृत्तसंस्थेचे गेली 40 वर्षे मानधनावर मी काम करत आहे. नगरसारख्या ग्रामीण भागातील विविध घटना या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून देशपातळीवर मला पोहचवता आल्या. वृत्रपत्र छायाचित्रकार आणि दैनिकांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करत असताना विविध क्षेत्रातील मोठा परिवार मला या माध्यमातून मिळाला.

No comments:

Post a Comment