अजीम काझी नगरचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल - दामोदर भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

अजीम काझी नगरचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल - दामोदर भोसले

 इंग्लंड दौर्‍यासाठी कैलास उडपीच्यावतीने शुभेच्छा

अजीम काझी नगरचे नाव जागतिक पातळीवर उंचावेल - दामोदर भोसले

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरमधील अनेक कलाकार, खेळाडू, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांनी आपल्या कर्तृत्वाने देश-परदेशात किर्ती मिळवून नगरचे नाव झळकाविले आहे. हीच परंपरा आजही सुरु आहे. अजीम काझी हा आपल्या जिद्द व मेहनतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये चमकरदार कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आहे. आता त्याची इंग्लड दौर्यासाठी झालेली निवड ही नगरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. याही स्पर्धेत तो चांगली कामगिरी करुन स्वत:बरोबरच नगरचे नावही जागतिक पातळीवर उंचावेल, असा विश्वास कैलास उडपीचे संचालक दामोदर भोसले यांनी व्यक्त केला.
   इंग्लंड येथे होणार्‍या क्रिकेट सामन्यासाठी निवड झाल्याबद्दल रणजी क्रिकेटपटू अजीम काझी यांचा कैलास उडपीच्यावतीने संचालक दामोदर भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.लोंढे, कमलेश जाधव आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना अजीम काझी म्हणाला, नगरकरांचे प्रेम आणि प्रोत्साहन यामुळे आपणास प्रेरणा मिळत असून, क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करुन सर्वांच्या सदिच्छाने आपण यश मिळवू असा विश्वास व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here