महापौर’पदावर आता ‘काँग्रेस’चाही दावा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

महापौर’पदावर आता ‘काँग्रेस’चाही दावा !

 किरण काळे यांच्या रूपाने नगर शहरात काँग्रेस पक्षाला नवचैतन्य - ना. थोरात‘

महापौर’पदावर आता ‘काँग्रेस’चाही दावा !
किरण काळेंचा नेतृत्वावर शिक्कामोर्तब.
प्रा. असिर सर यांच्या नंतर नगर शहरामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीने जाण्याची क्षमता असणारा चेहरा म्हणून किरण काळे यांच्याकडे नगर शहर पाहत आहे. त्याचा धागा काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं तर ही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे काळे यांचे भवितव्य उज्वल आहे.- मनोज गुंदेचा, ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर पालिकेच्या आगामी महापौर पदावर सर्वच पक्षांचा दावा ठोकला असताना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच ‘महापौर’ असेल असा दावा आज ठोकला आहे. शिवसेना अनेक दिवसांपासून महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही महापौरपद हवे आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असल्यामुळे या आघाडीतील प्रत्येक पक्षाला आगामी निवडणुकीत आपला महापौर असावा असे वाटू लागले आहे. काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.  किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
   शहर जिल्हा काँग्रेची  संघटनात्मक आढावा बैठक ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते.
   यावेळी बोलताना ना.थोरात म्हणाले की संघटनात्मक फेरबदल करत असताना नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या रूपाने नवीन दमाचा चेहरा पक्षाने दिला आहे. शहरामध्ये काँग्रेस जोमाने काम करत आहे. मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद काळे यांच्या पाठीशी उभी केली जाईल. यावेळी बोलताना किरण काळे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोरच महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी अभद्र युतीवर सडकून टीका केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. काँग्रेस शहरामध्ये त्यामुळे विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलिल सय्यद, सरचिटणीस नलिनी गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जाहिद शेख आदींची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन युवक काँग्रेस अध्यक्ष ड. अक्षय कुलट यांनी केले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, जरीना पठाण, उषा भगत, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, सेवादल अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, नलिनी गायकवाड, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, सुमन कालापहाड, शबाना शेख, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment