ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ

 रुईछत्तीसीचे मा. सरपंच रमेश भांबरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहिला आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना गावतापळीपर्यंत पोहचवून यशस्वीपणे राबवित असल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली आहे. ग्रामीण भागातील जनता नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर व मा. शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराबरोबर राहिले आहे. रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे हे तळागाळातील कार्यकर्ता आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे गावच्या विकासात भर पडत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य गावकर्‍यांनी राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देतो व पुढील काळात एकनिष्ठाने पक्षाचे विकासाचे ध्येय धोरण पोहचविण्याचे काम कराल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
   यावेळी बोलताना रमेश भांबरे म्हणाले की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सीना नदीवरील धामणतळे उचल पाणी योजना मार्गी लागल्यास 1500 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येण्यास मदत होईल तसेच रुईछत्तीसी गावची स्मशानभूमी व रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली. गेली 270 वर्षे रुईछत्तीसीचे ग्रामस्थ विकास कामाच्या पाठीमागे उभे राहिल्यामुळे ग्रामपंचायतची सत्ता आमच्या ताब्यात दिली आहे. गावच्या विकासकामासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्वेश करीत आहोत. रुईछत्तीसीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी जिल्ह्यातील पहिली नळपाणी योजना गावामध्ये राबविली. याचबरोबर आदर्श असे ग्रामपंचायत कार्यालय निर्माण केले. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करुन युवकांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या विकासकामाबरोबर कोरोना संकटाच्या काळामध्ये गावातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्याचे काम केले. या परिसरासह इतर गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.
   नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे, सरपंच विलास लोखंडे, उपसरपंच विशाल भांबरे, मच्छिंद्र भांबरे, अशोक भुजबळ, भैय्या गोरे, सागर गोरे, नानासाहेब खकाळ, संजय खकाळ, बाबासाहेब पवार, प्रशांत वाळके, निलेश गोरे, शरद गोरे, दत्तात्रय पवार, शरद पवार, धनंजय खकाळ, भरत भुजबळ, बबन गोरे, रियाज शेख, जावेद शेख आदींनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आ. अरुणकाका जगताप, आ. नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नेते घनशाम अण्णा शेलार, अंबादास गारुडकर, अभिजित खोसे सीताराम काकडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment