न्यायासाठी महिलांनी कायद्याचा वापर करावा : पल्लवी देशमुख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

न्यायासाठी महिलांनी कायद्याचा वापर करावा : पल्लवी देशमुख

 महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांसाठी सुरक्षा जनजागर शिबीर

न्यायासाठी महिलांनी कायद्याचा वापर करावा : पल्लवी देशमुख

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महिलांचे कायदे हे महिलांना सुरक्षा देणारे कायदे आहेत. तसेच नवनवीन कायदे निर्माण होत असून या कायद्यांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षा मिळाले असून न्यायासाठी वापर करावा. महिला कायद्यामुळे समाजामध्ये महिलांवर अन्याय करणार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन भरोसा सेलचे पोलिस उपनिरीक्षक पल्लवी देशमुख यांनी केले.शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठीसुरक्षा जनजागर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना भरोसा सेलचे पोलिस उपनिरीक्षक पल्लवी देशमुख. समवेत शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष घनशाम सानप व महिला यावेळी उपस्थित होत्या. घनशाम सानप यांनी यावेळी महिलांना स्वरक्षणाचे धडे प्रात्यक्षिक करुन दाखविले. रेशमा आठरे म्हणाले की, महिलांसाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याचबरोबर महिलांसाठी असणार्‍या शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना व्हावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर महिलांना सुरक्षिततेसाठी कायद्याची जाण असणे गरजेचे आहे. त्यासाठी महिला सुरक्षा जनजागर कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले, असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here