जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन

 जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधना नंतर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी गांधी यांच्या घरी जावून सरोज गांधी, देवेंद्र गांधी व सुवेंद्र गांधी यांचे सांत्वन केले. स्व. गांधीच्या प्रतिमेचे दर्शन घेवून अभिवादन केले. यावेळी मंत्री गडाख यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिलीप गांधी व गडाख कुटुंबाचा 1975 पासून स्नेह होता. माजी खासदार यशवंतराव गडाख व दिलीप गांधी यांची जुनी मैत्री होती. विकासाचा मोठा दृष्टीकोन असलेला नेता आपल्यातून गेला आहे, अशा शब्दात ना. शंकरराव गडाख यांनी  स्व.गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here