पंधरा लाखांची खंडणी मागितली, दोघेजण जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

पंधरा लाखांची खंडणी मागितली, दोघेजण जेरबंद

 पंधरा लाखांची खंडणी मागितली, दोघेजण जेरबंद


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पंधरा  लाखाची खंडणी मागणा-या दोघा खंडणी बहाद्दरांना जेरबंद  करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. कुलदीप कासार, सोनू गुंड (दोघ. रा.वाळकी ता जि अहमदनगर ) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
   याबाबत समजलेली माहिती अशी की, वेळोवेळी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली व तुम्ही जर खंडणी दिली नाही तर तुमच्या घरातील सर्वांना उचलून नेऊन जीवे ठार मारून टाकीन अशी फोनवरून व समोर येऊन धमकी देत असे, या फिर्यादीवरून कुलदीप रुपचंद कासार, अशोक उर्फ सोनू विठ्ठल गुंड या दोघांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं 92/2021 भादंविक 384,386,120 ल, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे. उर्वरित आरोपी विश्वजित रमेश कासार व मयूर बापूसाहेब नाईक हे दोघे यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here