राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पुण्यस्मृतीनिमित्त आनंदऋषीजी ब्लड सेंटर येथे 21 ते 31 मार्च दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पुण्यस्मृतीनिमित्त आनंदऋषीजी ब्लड सेंटर येथे 21 ते 31 मार्च दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन

 राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पुण्यस्मृतीनिमित्त आनंदऋषीजी ब्लड सेंटर येथे 21 ते 31 मार्च दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 29 व्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदऋषीजी ब्लड सेंटर आणि सकल मानव सेवा समितीच्यावतीने दि.21 ते 31 मार्च या कालावधीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत रक्तदाते स्वेच्छेने आनंदऋषीजी ब्लड सेंटरमध्ये येवून रक्तदान करू शकतील. याठिकाणी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून तसेच सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याने प्रत्येक जण निर्धोकपणे रक्तदान करू शकेल, अशी माहिती जैन सोशल फेडरेशनच्यावतीने देण्यात आली आहे.
   आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे काम जैन सोशल फेडरेशन सातत्याने करीत आहे. आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाचे पवित्र कार्य करून रक्तदाते आचार्यश्रींना पुण्यस्मृतीनिमित्त अभिवादन करू शकतील. ऍनेमिया, थॅलेसेमिया, डिलिव्हरी, अपघातग्रस्त अशा अनेक रूग्णांना रक्ताची गरज भासते. सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने अशा अत्यवस्थ रूग्णांना सेवा देताना अडचणी येतात. यासाठी निरोगी व्यक्तीने रक्तदान करणे आवश्यक आहे. आनंदऋषीजी ब्लड सेंटर येथे सुरक्षितपणे रक्तदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांची ब्लड सेंटरमध्ये येण्याची व्यवस्था नसेल त्यांच्यासाठी चार ते पाच जणांचा ग्रुप असल्यास ब्लड सेंटरची गाडी उपलब्ध असेल. ही गाडी रक्तदात्यांना घेवून येईल तसेच रक्तदानानंतर पुन्हा सोडण्याची व्यवस्थाही केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क - 9975392650, 9527720101, 0241-2320472.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here