प्रा.जवाहर मुथा हे तरूणांचे हक्काचे मार्गदर्शक : मुनोत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

प्रा.जवाहर मुथा हे तरूणांचे हक्काचे मार्गदर्शक : मुनोत

 प्रा.जवाहर मुथा हे तरूणांचे हक्काचे मार्गदर्शक : मुनोत

जय आनंद मंडळातर्फे प्रा.मुथा यांचे ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः वयाच्या ऐंशीव्या वर्षीही प्रा.जवाहर मुथा यांचा उत्साह दांडगा असून समाजासाठी सतत काही तरी करण्याची त्यांची धडपड असते. जय आनंद मंडळाच्या स्थापनेपासून ते तरूणांचे हक्काचे मार्गदर्शक आहे. साहित्य, सामाजिक क्षेत्रात काम करताना ते नेहमी युवा पिढीला समाजाप्रती दायित्त्व ठेवण्याचा सल्ला देतात. चांगले काम करणार्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारुन प्रोत्साहन देतात. तरूणांशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधून सर्वांना आपलेसे करून घेतात. जैन साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून ज्योतिषाचाही त्यांना अभ्यास आहे. संवेदनशील कवी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या साहित्यावर सारडा कॉलेजमधील प्रा.राजू रिक्कल यांनी पुणे विद्यापीठात पीएचडी केली आहे. साहित्यक्षेत्रात नगरचे नाव कायम झळकावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा जय आनंद मंडळाचे योगेश मुनोत यांनी दिल्या.
   ज्येष्ठ साहित्यिक प्रा.जवाहर मुथा यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे त्यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बाबालाल गांधी, सेके्रटरी हेमंत मुथा, अमित गांधी, कुंतीलाल राका, विनोद भंडारी, सत्येन मुथा आदी उपस्थित होते.
   प्रा.जवाहर मुथा म्हणाले की, जय आनंद मंडळाचे युवा सदस्य नेहमीच विधायक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. त्यांच्या सहवासात मलाही तरूण झाल्यासारखे वाटते. अतिशय प्रगल्भ काम करणारी ही मंडळी आजूबाजूला असणे हे नेहमीच आनंददायी असते. त्यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा मोठा आनंद देणार्‍या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here