ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शेख शम्सुद्दीन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 2, 2021

ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शेख शम्सुद्दीन

 ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शेख शम्सुद्दीन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे केरला येथील हजरत चप्पानागाडी बाप्पू मुसलियार यांचे नातू शैख़ शम्सुद्दीन यांची ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी ऑल इंडिया उलमा बोर्डाचे आर्थिक सचिव वारिस अली, जनरल सेक्रेटरी अंजर अन्वर खान नदवी, उपाध्यक्ष नायाब अन्सारी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात शैख़ शम्सुद्दीन यांचे मोठे योगदान असून देशात सुख शांती कशी नांदेड यावरही त्यांचे मोठे कार्य आहे. भारतात उलेमा बोर्डाचे मोठे महत्व असून अख्या जगात उलमा बोर्डाचे चांगले नाव आहे. अशा या बोर्डावर शम्सुद्दीन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले असून मुस्लीम समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांना पाठपुरावा करण्याची विनंती केली.

No comments:

Post a Comment