महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघ विजयी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघ विजयी

 महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघ विजयी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या पीपीएल क्रिकेट स्पर्धेत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा क्रिकेट सामना रंगला होता. पंजाबी सुपर क्वीन्स विरुध्द रॉकिंग ब्ल्यूस या महिलांच्या संघात झालेल्या सामन्यात पंजाबी सुपर क्वीन्स संघाने विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत क्रिकेटचे मैदान देखील महिलांनी गाजवले.
   पंजाबी युथ ऑर्गनायझेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त विशेष सामना खेळविण्यात आला. पंजाबी सुपर क्वीन्स कर्णधार नेहा देडगावकर-जग्गी तर रॉकिंग ब्ल्यूसच्या कर्णधार साक्षी कपूर या होत्या. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज जागृती ओबेरॉय, उत्कृष्ट गोलंदाज गीता नय्यर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डॉ.सिमरन वधवा तर वुमन ऑफ दी मॅच नेहा देडगावकर-जग्गी ठरल्या. क्रेजी प्लेअरचा मान कशीश ओबेरॉय यांनी पटकाविला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here