भिंगारला संत वीरशैव कक्कय्या महाराज यांची 916 वी जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

भिंगारला संत वीरशैव कक्कय्या महाराज यांची 916 वी जयंती साजरी

 भिंगारला संत वीरशैव कक्कय्या महाराज यांची 916 वी जयंती साजरी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने संत वीरशैव कक्कय्या महाराज यांची 916 वी जयंती भिंगारला साजरी करण्यात आली. वीरशैव कक्कय्या महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश काशिनाथ त्रिमुखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेता ही जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. प्रास्ताविकात सुरेंद्रकुमार बोराडे यांनी वीरशैव कक्कय्या ढोर समाज विकास मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची आढावा घेतला. रमेश त्रिमुखे म्हणाले की, ढोर समाज 12 व्या शतकापासून उदयास आला. संत वीरशैव कक्कय्या महाराज यांनी मानवतेची शिकवण दिली. त्यांचे विचार आजही सर्व समाजाला प्रेरक असल्याचे सांगून त्यांच्याविषयी माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके यांनी समाज बांधवाना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सचिव गणेश नारायने यांनी ढोर समाजाचा कातडी कमावणे हा व्यवसाय होता. तंत्रज्ञानाच्या युगात हा व्यवसाय संपुष्टात आला आहे. मात्र समाजबांधवांनी आपल्या पुर्वजांच्या व्यवसायाची व इतिहासाची माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. संस्थेचे जेष्ठ सभासद सुभाष त्रिमुखे यांनी संस्थेच्या पुढील कार्यासाठी आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली. यावेळी किशोर भालशंकर, अनिल त्रिमुखे, विशाल त्रिमुखे, किरण त्रिमुखे, राजू (पिंटू) कोकणे, संजय कवडे, जयश्री त्रिमुखे, सुशिला त्रिमुखे, वैभव कळंबे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here