अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी

 अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपुर्ण जिल्ह्यात एक आठवड्याचे लॉकडाऊन करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेख सांगळे, जिल्हा दक्षिण सचिव गणेश गायकवाड, राहुल देशमुख, अच्युत गाडे, मुयर पवार, नितीन पोटे आदी उपस्थित होते.  
   मागील तीन दिवसात जिल्ह्यात पाचशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दर दिवसाला रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दि.25 मार्चला विक्रमी तेराशे रुग्ण आढळून आले. शेजारील बीड जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्रात विविध ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. शासकीय सुट्ट्या येत असल्याने शहरात गर्दी होण्याची संभावना आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात दि.28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत एक आठवड्याचा लॉकडाऊन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment