घरकुल वंचितांना दिलासा मिळण्यासाठी घरकुल महसूल लोकअदालत भरवावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

घरकुल वंचितांना दिलासा मिळण्यासाठी घरकुल महसूल लोकअदालत भरवावी

 घरकुल वंचितांना दिलासा मिळण्यासाठी घरकुल महसूल लोकअदालत भरवावी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने गावोगावी घरकुल महसूल लोकअदालत भरवून, ग्रामीण भागातील घरकुल वंचितांना दिलासा देण्याची मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
   गावालगत असलेल्या नापीक व माळरानावरील जमीनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत अनुदानातून पाचशे चौरस फुटा पर्यंत जमीन घरकुल वंचितांना द्यावी, तर घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन दिल्यास ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्न सुटणार आहे. सरकारकडे जागा नसल्याने पंतप्रधान आवास योजना बारगळली आहे. या योजनेला गती देण्यासाठी घरकुल महसूल लोकअदालत प्रभावी ठरणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
   संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व डीआरडीएच्या अधिकार्यांपुढे घरकुल महसूल लोकअदालतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यांच्याकडून या प्रस्तावाला सकारात्मक उत्तर मिळाले आहे. सरकारकडून घरकुल वंचितांना गायरान व वन जमीनी मिळणे अशक्य आहे. तर पर्यायी जागा देखील उपलब्ध नसल्याने खाजगी नापिक जमीनी ताब्यात घेऊन सरकारने घरकुल महसूल लोकअदालतच्या माध्यमातून रस्ते, वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्न सुटून दिलासा मिळणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. घरकुल महसूल लोकअदालतसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागूल, फरिदा शेख, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here