अन्नधान्य अपहारप्रकरणी कोरडगाव सोसायटीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

अन्नधान्य अपहारप्रकरणी कोरडगाव सोसायटीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी

 अन्नधान्य अपहारप्रकरणी कोरडगाव सोसायटीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी

वंचित बहुजन आघाडीची मागणी, जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदन.

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अखत्यारीतील स्वस्त धान्य दुकानात झालेल्या अन्नधान्याच्या अपहारस जबाबदार असणार्‍या चेअरमन, संचालक व सेल्समन विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाथर्डी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रताप देशमुख व विनायक देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव विविध कार्यकारी सोयासायटी अंतर्गत असलेल्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून सोसायटीचे चेअरमन, संचालक व सेल्समन हे संगन मताने अन्नधान्याचा अपहार करत असल्याबाबतची लेखी तक्रार ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे मात्र तालुका प्रशासन संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन सोमवार दि. 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी  यांच्याकडे देण्यात आले आहे.
   सदर सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्याचा अपहार होत असल्याची तक्रार 1 मार्च रोजी पाथर्डीचे तहसीलदार, पुरवठा अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. मात्र याबाबत तातडीने कारवाई न झाल्यामुळे 1 मार्च रोजी रात्री सोसायटीच्या संचालकांनी कोरडगाव येथील शाळेतील अन्नधान्य इतरत्र हलविले. पुरवठा निरीक्षकांनी 1 मार्च ऐवजी 2 मार्च रोजी सदर घटनेचा पंचनामा केला. त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरडगाव येथील एका खोलीत झचॠघ-ध योजनेतील रेशनचा 43.5 क्विंटल गहू व 17.5 क्विंटल तांदूळ आढळून आला. त्यावेळी सोसायटीच्या संचालनाच्या मर्जीतील व्यक्तींना तेथे पंच म्हणून बोलविण्यात आले व त्या पंचनाम्यावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. सदर पंच हे सोयासायटीच्या संचालकांच्या मर्जीतील असल्यामुळे ते आपली साक्ष भविष्यात फिरवू शकतात. अशी शंका प्रताप देशमुख व विनायक देशमुख यांनी उपस्थित केली.
    सदर घटनेचा पंचनामा केल्यानंतर पुरवठा विभागाने सदर खोली सिलबंद न करता खोलीला साधे कुलूप लावले आहे. जेणे करून हे कुलूप रात्री बे रात्री कुणीही उघडू शकते. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत रेशन वरील धान्याच्या गोण्या टाकताना गट शिक्षणाधिकारी किंवा गटविकास अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता मनमानी पध्दतीने मुख्याध्यापकांनी शाळेत अन्नधान्य टाकण्यासाठी परवानगी कशी काय दिली हाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
    धान्य वाटप कामी आवश्यक असणारे पॉस मशीन, ताबडतोब सील करून ताब्यात घेणे आवश्यक असतांना तहसीलदारांनी तशी कुठलीही कारवाई न करता केवळ कारवाईचा फार्स केला. सदर धान्य अपहाराबाबत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होने गरजेचे असतांना तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here